भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला दुसरा कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात आटोपला. यानंतर खेळपट्टीबद्दल अनेकांनी आपली मते मांडली. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनीही यावर निशाना साधला. भारतातील फिरकीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर नेहमीच टीका होत आली आहे. पण सेना देशांमधील खेळपट्टीवर कोणीच काही बोलत नाही. याच पार्श्वभूमीवर गावसकरांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊमध्ये (Cape Town Test) झाला. या सामन्यात भारताने 7 विकेट राखून यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला. अवघ्या दुसऱ्याच दिवसी हा सामना संपला. यामध्ये फक्त 642 चेंडूंचा खेळ झाला. याच कारणास्तानव कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला. सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 23.2 षटके तर भारताने पहिल्या डावात 34.5 षटके खेळली. यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 36.5 षटके खेळण्यात यश मिळवल. प्रत्युत्तरात भारताने निर्धारीत लक्ष 12 षटकांमध्ये गाठले.
सेना देशांच्या पिच क्यूरेटरवरही प्रश्न उपस्थित करायला हवेत- सुनिल गावस्कर
भारतीय दिग्गज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते या खेळपट्टीपर देखिल प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. त्यांनी मिड-डे साठीच्या लेखात लिहले की, “पिच क्युरेटर कडून चूक झाली, या प्रकारची कारणे देण ही सेना देशांची सवय आहे. जेव्हा आमचे पिच क्यूरेटर पिच बनवतात तेव्हा त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. मागील वर्षात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झालेला. त्यावेळी त्यांच्या माजी कर्णधाराने खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले होते. याचा अर्थ आम्ही ठरवून करतो आणि तुम्ही चुकून करता.”
दरम्यान, उभय संघातील या केटपाऊन कसोटीचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात दक्षिण आप्रिका 55, तर भारताने 176 धावा केल्या. पहिल्या डावात भारतीय संघ आगाडीवर होता. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 153 धावांपर्यंत मजल मारली आणि भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य दिले. भारताने तीन विकेट्सच्या नुकसानावर हा सामना जिंकला. जसप्रीत बुमराह याला मालिकावीर, तर मोहम्मद सिराज याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. (Sunil Gavaskar raised questions on the pitch of Cape Town Test )
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! आफ्रिकन दिग्गजाची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, कारकिर्दीत खेळलाय फक्त 4 सामने
सूर्यकुमार यादवचे मैदानात परतणे कठीण, दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर