---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी महान कर्णधाराने निवडली भारताची सलामी जोडी, रोहितसह ‘या’ फलंदाजाचं घेतलं नाव

On: गुरूवार, जून 23, 2022 3:45 PM
Hitman-Rohit-Sharma
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२२ अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला १० टी२० सामने खेळायचे आहेत, ज्याद्वारे भारतीय खेळाडू टी२० विश्वचषकासाठी तयारी करतील. या सामन्यांद्वारे भारताचे संघ व्यवस्थापन मजबूत संघबांधणी करेल व तोच संघ टी२० विश्वचषकासाठी पाठवण्यात येईल.

दरम्यान भारतीय संघाच्या (Team India) सलामी जोडीवरही (Indian Team Opening Pair) सर्वांची नजर असेल. कारण टी२० क्रिकेटमध्ये अशा सलामी जोडीची आवश्यकता असते, जी पावरप्लेमध्ये झटपट धावा करू शकेल. यामुळे मधल्या फळीवरील दबाव कमी होतो आणि संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरतो. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारताची सलामी जोडी निवडली आहे.

गावसकर म्हणाले की, टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची सलामी जोडी निश्चित आहे. फक्त खेळाडूंना विश्वचषकापूर्वी स्वत:ला पूर्णपणे फिट बनवावे लागेल. गावसकरांनी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. परंतु राहुलची निवड त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे गावसकरांचे म्हणणे आहे.

सलामीवीर म्हणून केएल राहुलचे आकडे
टी२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून राहुल यशस्वी फलंदाज राहिला आहे. त्याने ३८ डावांमध्ये सलामीला फलंदाजी करताना ३९.७७ च्या सरासरीने १३९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ९२ धावा इतकी राहिली आहे. तसेच त्याने सलामीवीर म्हणून १५ अर्धशतकेही केली आहेत.

दुखापतीशी झगडतोय केएल राहुल
केएल राहुल सध्या ग्रोइनच्या दुखापतीशी झगडत आहे. ज्या कारणामुळे त्याला शेवटच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडावे लागले. या मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, राहुल संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. तो सध्या त्याच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेला आहे. अशात टी२० विश्वचषकापूर्वी त्याचे भारतीय संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

रणजीच्या अंतिम सामन्यात सरफराजचे झुंजार शतक, शानदार खेळीनंतर भरून आले डोळे; पाहा Video

अरेरे! फक्त एका धावेने हुकले डेविड वॉर्नरचे शतक, ९९ वर यष्टीचीत होत लाजिरवाणा विक्रमही नावावर

‘माझ्या आवडत्या जर्सीतील..’, रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १५ वर्षे पूर्ण, शेअर केला भावूक संदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---