---Advertisement---

…म्हणून पृथ्वी शाॅला दुसऱ्या कसोटीत द्या डच्चू, सुनील गावसकर यांनी केली मागणी

On: शनिवार, डिसेंबर 19, 2020 7:00 PM
---Advertisement---

पृथ्वी शाॅच्या फलंदाजीमध्ये कोणतेही सुधारण्याची लक्षणे दिसत नाहीत. भारताचे माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. अॅडलेडमध्ये दुसर्‍या डावात पृथ्वी अपयशी ठरल्यानंतर गावसकरांनी प्रतिक्रीया दिली. पहिल्या डावात शून्यावर आउट झाल्यानंतर, हा युवा खेळाडू दुसर्‍या डावात फक्त 4 धावा करू शकला. तो ज्या प्रकारे आउट झाला तो चिंतेचा विषय आहे. दोन्ही डावात त्याला बोल्ड करण्यात आले.

पहिल्या कसोटीत प्लेईंग इलेव्हन मध्ये पृथ्वीच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि सलामी फलंदाज म्हणून केवळ आपल्यासाठी गोष्टी खराब केल्या, त्याचबरोबर संघ व्यवस्थापकांना ही पुढील विचार करण्यासाठी भाग पाडले आहे. पृथ्वीच्या जागी शुभमन गिलला मयंक अग्रवाल सोबत डावाची सुरुवात करायला हवी असा पाठिंबा दिला जात आहे. पृथ्वीला ज्या परीस्थितीत फलंदाजी करताना पाहिले, त्या ठिकाणी गिल खुप शांत दिसून आला. ज्याने अजून कसोटीत पदार्पण सुद्धा केले नाही. सराव सामन्यात गिलची धावसंख्या 0, 29, 43 आणि 65 होती. दुसर्‍या बाजुला पृथ्वीची धावसंख्या 0, 19, 40 आणि 3 होती. परंतु भारतीय संघाने युवा खेळाडू पृथ्वीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी दिली होती.

मात्र शाॅने दोन्ही डावात ही संधी गमावली आणि गावसकर यांनी त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. गावसकर म्हणाले, “पृथ्वीच्या टेक्निकमध्ये समस्या आहे आणि त्याने दुसरा सामना खेळू नये.”  पृथ्वीला टेक्निकमध्ये समस्या आहे. त्याला पुढच्या सामन्यात वगळले पाहिजे. आपल्या ट्विटमध्ये गुप्ता हे ही म्हणाला की, “गावसकरांना वाटते शुभमन गिलने डावाची सुरुवात करावी.” त्याने लिहले, ‘सनी भाईला वाटते शुभमन जर आपले राज्य पंजाबसाठी सलामीला येतो तर इथे ही सलामीला येवू शकतो.’

अॅडलेड कसोटीबद्दल बोलायचे तर पृथ्वी एकटाच अपयशी ठरलेला फलंदाज नव्हता. संघ फक्त 36 धावा करू शकला होता. भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या पानांप्रमाणे ढासळली होती. ही धावसंख्या भारतीय संघाची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. भारतीय फलंदाजांना दुहेरी धावसंख्या सुद्धा गाठता आली नाही. यामध्ये सर्वाधिक 9 धावा मयंक अग्रवालच्या होत्या. ऑस्ट्रेलिया कडून जोश हेझलवूडने 8 धावा देत 5 गडी बाद केले.

संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– पृथ्वीचा पुन्हा एकदा फ्लॉप शो; दुसर्‍या डावातही ठरला अपयशी
दुसऱ्या कसोटी सामन्यात नका देऊ संधी, पृथ्वी शॉच्या फ्लॉप खेळीला पाहून वैतागले समालोचक

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---