नवी दिल्ली | नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र रोहित शर्माला दुखापतीमुळे एकाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र याचवेळी मुंबई इंडियन्सने एक ट्विट केले आहे, ज्यात रोहित शर्मा नेटमध्ये सराव करत आहे. त्यामुळे ही कोणत्या प्रकारची दुखापत आहे हे मला समजल नाही. थोडी पारदर्शकता असली पाहिजे, असे मत या ट्विटनंतर महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्थान न देण्याबद्दल बीसीसीआयने ट्विट केले होते की वैद्यकीय टीम रोहित शर्मा आणि दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवेल. यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचे कयास लावले जात होते.
पण बीसीसीआयच्या ट्विटनंतर लगेचच काहीवेळात मुंबई इंडियन्सने रोहित सराव करत असलेले फोटो पोस्ट केले. त्यामुळे त्याच्या दुखापतीबद्दल सर्वांनाच गोंधळात टाकले आहे.
रोहितच्या दुखापतीची लोकांना असावी जाणीव
किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (26 ऑक्टोबर) सामन्यानंतर सुनील गावसकर म्हणाले की, “लोकांना या संपूर्ण प्रकरणावर जागरूक केले पाहिजे. आपण एका कसोटी मालिकेबद्दल बोलत आहोत, जो दीड महिन्यानंतर होणार आहे. रोहित नेटमध्ये सराव करत आहे. त्यामुळे ही कोणत्या प्रकारची दुखापत आहे, हे मला समजले नाही. मला वाटते की थोडी पारदर्शकता असावी, लोकांना रोहितची काय समस्या आहे याची जाणीव असली पाहिजे, यामुळे सर्वांना दिलासा मिळेल.”
रोहित, इशांतची निवड का झाली नाही हे जाणून घेण्याचा आहे हक्क
क्रिकेटच्या तीनही प्रकारात युवा फलंदाज मयंक अगरवालची भारतीय संघात निवड झाली आहे. निवड समितीने घेतलेल्या या निर्णयामुळेही प्रश्न उपस्थित झाले आहे. वास्तविक आयपीएलच्या मागील दोन सामन्यात पंजाबने त्याला संघात स्थान दिले नाही. अशा परिस्थितीत गावसकर म्हणाले की, “मयंक अगरवालला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे, परंतु रोहित आणि इशांतला संघातून वगळण्यात आले आहे. या दोन अनुभवी खेळाडूंची निवड का करण्यात आली नाही हे जाणून घेण्याचा चाहत्यांना हक्क आहे.”
इशांतला आयपीएलमध्ये झाली होती दुखापत
आयपीएलच्या सामन्यादरम्यान इशांत शर्माला मांसपेशीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याने दिल्ली कॅपिटल्स संघातून माघार घेतली होती. आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडेमीमध्ये सराव करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रोहितने ट्विटर, इंस्टाग्राम बायोमधून काढला ‘इंडियन क्रिकेटर’ टॅग, यामागे नक्की कारण काय?
“जस्टिस फॉर सुर्यकुमार यादव”, टीम इंडियात संधी न मिळाल्याने चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्त्वाची माहिती…
ट्रेंडिंग लेख –
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल