ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके पुढे ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व ऐडन मार्करम या जोडीने शानदार खेळ दाखवत संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला. या पराभवानंतर अनेक जण भारतीय संघाच्या संघनिवडीवर चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. त्यात आता माजी कर्णधार सुनील गावसकर यांची भर पडली आहे.
विजेतेपदाचे दावेदार म्हणून या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. खराऊ फलंदाजी व गचाळ क्षेत्ररक्षणामुळे हा पराभव स्वीकारावा लागल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. भारताचे माजी कर्णधार व समालोचक सुनील गावसकर यांनी या पराभवानंतर बोलताना संघाच्या रणनीतीवर बोट ठेवले. ते म्हणाले,
“मी संघाच्या फलंदाजीविषयी जास्त तिखट शब्दात बोलणार नाही. मात्र, सूर्यकुमार व्यतिरिक्त कोणीही अनुभव व जबाबदारीने खेळ दाखवला नसल्याचे मला वाटते. उदाहरणादाखल मी सांगू इच्छितो की, वेग व बाऊन्स पाहता फलंदाजांनी वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. मी एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याविषयी बोललो होतो. मात्र, दीपक हुडाने आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्यासमोर सूर्यकुमार उभा आहे हे पाहायला हवे होते.”
भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात बदल करत अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडा याला संधी दिली होती. मात्र, तो या संधीचा लाभ घेऊ शकला नाही. तिसऱ्याच चेंडूवर तो खातेही न खोलता तंबूत परतला. तसेच, गोलंदाज म्हणून त्याला एक षटकही गोलंदाजी देण्यात आली नाही. त्यामुळे देखील कर्णधार रोहित शर्मावर अनेकांनी टीका केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: आयर्लंडच्या गोलंदाजाविरुद्ध मार्शचा धोबीपछाड षटकार; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बापरे!’
रिषभ पंतने ओपनिंग केल्यानंतर बदलणार भारताचे नशीब; असं आम्ही नाही, तर पठ्ठ्याचा चाहताच म्हणतोय