भारतीय संघाच्या पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठी विराट कोहलीला कर्णधार म्हणून क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात कायम करण्यात आलेले आहे. यामुळे भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी निवड समीतीवर टीका केली होती.
गावस्करांनी निवड समीतीने कोणतीही बैठक न घेता हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी निवड समीतीला कमजोर म्हटले आहे.
या टीकेबद्दल निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गावस्करांचे नाव न घेता ही टीका दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
प्रसाद यांना कमजोर म्हटल्यावर तूम्हाला राग येतो का असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही दिग्गज क्रिकेटपटूंचा खूप आदर करतो. त्यांच्याद्वारे व्यक्त केलेले प्रत्येक मत योग्य अर्थाने घेतले जाते. त्यांची काही मते आहेत जी चांगल्याप्रकारे स्विकारली जातात. खरंतरं अशा प्रकारच्या प्रतिक्रियेमुळे निवड समीती अधिक मजबूत, वचनबद्ध आणि एकजूट होते.’
प्रसाद यांनी निवड समीतीच्या सदस्यांवर होणाऱ्या कमी अनुभवाच्या टीकेवर उत्तर देताना म्हटले आहे की जास्त क्रिकेट खेळले म्हणजे तूम्हाला जास्त माहिती असते, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–निवड समीतीवर अनुभवाच्या कारणावरुन होत असलेल्या टीकेबद्दल प्रसाद म्हणाले…
–८ महिन्यांच्या निलंबणाबाबत पृथ्वी शॉने दिली ही प्रतिक्रीया
–तो खेळाडू ९ वर्षापूर्वी करत होता हे काम, आता ऍशेसमध्ये पदार्पण करण्यासाठी आहे सज्ज






