मोठ्या अपेक्षा असताना दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. 2019 पासून गेल्या हंगामापर्यत हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. मात्र, यंदा दिल्लीला अपेक्षित खेळ करता आला नाही. दिल्लीने नवव्या स्थानी आयपीएल 2023 ची समाप्ती केली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हे संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये असतानाही संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. याच मुद्द्यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी परखड मत व्यक्त केले.
या हंगामात दिल्ली संघ नियमित कर्णधार रिषभ पंतशिवाय मैदानात उतरला. पंत गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झाला होता. याच कारणामुळे तो या हंगामात खेळू शकत नव्हता. त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नरने संघाचे नेतृत्व केले. वॉर्नरने स्वतः चांगली कामगिरी केली. मात्र, कर्णधार म्हणून तो अपयशी ठरला.
गावसकर यांनी एका क्रीडा साप्ताहिकासाठी लिहिलेल्या स्तंभात म्हटले , ज्या समस्या सहज सोडवायला हव्या होत्या, त्या सुटल्या नाहीत. मला वाटते की रिकी पॉंटिंग याच्याशी संवाद साधताना भारतीय युवा खेळाडूंना सहजता जाणवत नव्हती. त्यामुळे यश धुल, प्रियम गर्ग, सरफराज खान चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
त्यांनी पुढे लिहिले, पृथ्वी शॉ याच्यावर देखील शक्य तितकी मेहनत घेतली नाही. याच कारणाने तो संपूर्ण हंगामाचा अपयशी ठरला. फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेल याला फलंदाजीत वरच्या क्रमांकावर पाठवणे गरजेचे होते. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याचा आत्मविश्वास वाढवला नाही.
दिल्लीला या हंगामात केवळ पाच सामने जिंकता आले. तर 9 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.
(Sunil Gavaskar Slams Ricky Ponting And Sourav Ganguly For Delhi Capitals Poor Performance In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Qualifier 1: टॉसचा निकाल पंड्यासेनेच्या पारड्यात, CSK देणार का कडवी झुंज?
प्ले ऑफ्स किंग होता रैना! धडाकेबाज कामगिरीने सार्थ केलेले मि.आयपीएल नाव