भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांच्यासाठी रविवारी (25 डिसेंबर) एक वाईट बातमी समोर आली. त्यांच्या आईचे निधन झाले, ज्या मागच्या मोठ्या काळापासून आजारी होत्या. गावसकरांच्या आईचे नाव मीनल गावसकर असून वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतात आईचे निधन झाले असताना सुनील गावसकर मात्र त्यांच्या जवळ उपस्थित नव्हते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसाठी गावसकर समालोचकाची भूमिका पार पाडत होते.
रविवारी (25 डिसेंबर) भारत आणि बांगालदेश (IND vs BAN) यांच्यातील दुसरा कसोटी सामना निकाली निघाली. भारताने हा सामना जिंकून मालिका देखील नावावर केली. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) या कसोटी सामन्यात समालोचन करत होते. पण यादरम्यानच, त्यांना आईच्या निधनाची बातमी समजली. यापूर्वी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या मागच्या हंगामात देखील गावसकरांना आईच्या आजारपणामुळे तातडीने घर गाठावे लागले होते. आयपीएलचा हा 15 वा हंगाम असून यामध्ये बाद फेरीच्या सामन्यात आईच्या आजारपणामुळे त्यांना समालोचक करता आले नव्हते.
कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे गावसकर पहिले फलंदाज –
73 वर्षीय गावसकरांना भारतीय संघाचे मोठ्या काळापर्यंत नेतृत्व केले आणि सध्या ते समालोचकाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. त्यांनी भारतासाठी एकूण 125 कसोटी सामने खेळले असून यामध्ये 51.12 च्या सरासरीने 10,122 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे गावसकर जगातील पहिले फलंदाज होते. कसोटी कारकिर्दीत त्यांनी 45 अर्धशतक देखील केले होते. गावसकरांनी भारतासाठी 108 वनडे सामने खेळले असून यामध्ये 3092 धावा केल्या आहेत. 1983 साली विश्वचषक विजेत्या संघात देखील ते सामील होते. (Sunil Gavaskar’s mother passed away)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ख्रिसमसच्या दिवशी कसोटी जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ, उर्वरित दोन..
या सम हाच! विरोधी खेळाडूचे कौतुक करत विराटने गिफ्ट केली स्वतःची जर्सी; सर्वत्र होतेय कौतुक