बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ अडचणीत असताना केएल राहुल याने संघासाठी महत्वाची खेळी केली. मंगळवारी (26 डिसेंबर) सुरू झालेल्या या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत होता. पण केएल राहुल याने संयमी खेळी करत बुधवारी (27 डिसेंबर) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. राहुलला या खेळीसाठी माजी दिग्गज सुनील गावसकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. पहिल्या डावात भारताने 245 धावा केल्यानंतर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाच्या चहापाणापर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने 3 विकेट्सच्या नुकसानावर 113 धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात केलेल्या धावसंख्येसाठी केएल राहुल (KL Rahul) याचे शतक महत्वाचे ठरले. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी म्हणून राहुलचे हे प्रदर्शन लक्षात राहील.
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान सलामचोकाच्या भूमिकेत दिसत आहेत. गावसकर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले, “50 वर्षांपासून क्रिकेट पाहत आहे. केएल राहुलचे हे शतक भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्त 10 खेळींपैकी एक आहे, असं नक्कीच असं म्हणू शकतो.”
दरम्यान, पहिल्या डावात भारताला 245 धावांपर्यंत पोहोचवण्यासाठी विराट कोहली याने 38, तर श्रेयस अय्यर 31 धावांचे योगदान देऊ शकला. पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर विराट आणि श्रेयसने संघासाठी पाया तयार केला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावात कागिसो रबाडा याने 20 षटकात 59 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. तसेच नांद्रे बर्गर याने तीन विकेट्स घेतल्या. आफ्रिकी संघ फलंदाजीला आल्यानंतर डीन एल्गर याने शतकी खेळी साकारली. (Sunil Gavaskar’s special reaction to KL Rahul’s century)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
आजपर्यंत जमलं नाही ते शेवटच्या मालिकेत केलं! जाणून घ्या निवृत्त होत असलेल्या एल्गरच्या शतकाचं महत्व
IND vs SA: हर्शल गिब्स कर्णधार बावुमावर संतापला; म्हणाला, ‘तो लठ्ठ आणि अनफिट…’