भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच नवीन निवडसमितीची घोषणा केली आहे. निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपले पद कायम राखले असले तरी, अन्य चार जणांना पदामुक्त करण्यात आले. त्यापैकी एक सदस्य आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पुनरागमन करताना दिसणार आहे. भारताचे माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांची पंजाब किंग्सने फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पंजाब फ्रँचायझीने सोमवारी (16 जानेवारी) ही माहिती दिली.
सुनील जोशी 2020 मध्ये निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. परंतु त्यानंतर चेतन शर्मा यांचा समितीत समावेश झाल्याने त्यांना अध्यक्ष बनवले गेले. असे असताना जोशी हे दक्षिण विभागाचे प्रतिनिधी म्हणून समितीत सहभागी होते. आयसीसी टी20 विश्वचषक 2022 नंतर बीसीसीआयने नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवले होते. जोशी यांनी देखील या पदासाठी पुन्हा अर्ज केला होता. मात्र, त्यांची निवड होऊ शकली नाही.
We are excited to announce that former Indian left-arm spinner Sunil Joshi has been appointed as Punjab Kings Spin Bowling Coach. 🤩#SherSquad, let's give him a warm welcome! 🙏🏽#SaddaPunjab #PunjabKings #SunilJoshi @SunilJoshi_Spin pic.twitter.com/MN459TEuK5
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 16, 2023
भारतासाठी 15 कसोटी आणि 69 वनडे सामने खेळलेले जोशी 2008 आणि 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून आयपीएल खेळलेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते या लीगमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहेत. पंजाबने त्यांच्या नियुक्तीची माहिती देताना लिहिले,
‘भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी यांना संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक बनवताना आम्हाला आनंद होत आहे.’
आयपीएल 2023 साठी पंजाबने नवी रणनीती आखलेली आहे. यावेळी संघाचे नेतृत्व अनुभवी शिखर धवन करेल. तर, मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे यांना हटवून ट्रेव्हर बायलिस यांना नियुक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॅडिन संघाचा सहाय्यक प्रशिक्षक तर, वसीम जाफर फलंदाजी प्रशिक्षक असेल. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दक्षिण आफ्रिकेचा चार्ल्स लॅंगवेल्ट हा सांभाळेल.
(Sunil Joshi Added In Punjab Kings As Spin Bowling Coach)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘रोहितलाही विराटसारखी वागणूक द्या…’, गौतम गंभारची मोठी प्रतिक्रिया