भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नंतर वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडू सुनील नरेनने सुद्धा एक आनंदाची गोड बातमी दिली आहे. या खेळाडूच्या घरात एका तान्ह्या बाळाचे आगमन झाले आहे. सोमवारी (०१ फेब्रुवारी) त्याची पत्नी एंजेलिना हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
सुनील नरेन याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली असून आपल्या मुलाचे छायाचित्रे देखील पोस्ट केले आहे. आपल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले आहे की, ‘तू (नरेनचा मुलगा) माझ्या हृद्यातील ती जागा भरून काढली आहे, ज्याची मला जाणीवही नव्हती. तुझ्या चेहऱ्यावर आम्ही देवाची कृपा आणि दया पाहिली आहे. आमच तुझ्यावर खूप प्रेम आहे.’
नविन पाहुण्याच्या आगमनाची दिली होती माहिती
डिसेंबरमध्ये सुनील नरेन याने सांगितले होते की, त्याच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. सुनिलच्या राहत्या शहरात त्रिनिदाद-टोबॅगो मध्येही यासाठी धुमधडाक्यात उत्सव साजरे करण्यात आले होते. त्यानंतर नरेनने आपल्या गरोजर पत्नी एंजेलियासोबत फोटोशूट केले होते.
https://www.instagram.com/p/CKuz0OHhnwK/?utm_source=ig_web_button_share_sheet
सुनील नरेनची क्रिकेट कारकिर्द
सुनील नरेनने आयपीएलच्या सहाव्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हापासून तो कोलकाता संघात कायम असून आजवर त्याने १२० आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान २४.७८च्या सरासरीने त्याने १२७ विकेट्स घेतल्या आहेत. यात १९ धावांवर ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
सुनील नरेन सध्या अबुधाबी मध्ये टी१० लीगमध्ये खेळत असून आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळी तो आपल्या पत्नीसोबत नसल्याची खंत त्याला आहे. त्याचप्रमाणे हा खेळाडू डेक्कन ग्लॅडीएटर्स संघाचा सदस्य असून आतापर्यंत त्याने ३ सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात फिल्डर कपडे बदलण्यात व्यस्त अन् चेंडू सीमारेषेपार, पाहा मजेशीर व्हिडिओ
शमी नव्हे तर जहां..! मोहम्मद शमीच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, लेकीच्या नावापुढे लावलं आपलं आडनाव
टीम इंडियाचा सरावाला प्रारंभ; प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं जोरदार स्वागत, पाहा फोटो