लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२२मधील ५३वा सामना शनिवारी (दि. ०७ मे) दिमाखात पार पडला. पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊने ७५ धावांनी मोठा विजय मिळवला. कोलकाताला या सामन्यात पराभूत व्हावे लागले असले, तरीही त्यांचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने खास कारनामा केला आहे.
या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्या फलंदाजी करताना लखनऊने ७ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या आणि कोलकाताला १७७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाला खास प्रदर्शन करता आले नाही. कोलकाताचे फलंदाज नियमित अंतराने तंबूत परतले. मात्र, यावेळी सुनील नारायणने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १२ चेंडूत २२ धावांची छोटेखानी खेळी केली. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता.
या २२ धावांच्या जोरावर त्याने आपल्या आयपीएलमधील १००० धावांचा टप्पा पार केला. तसेच, त्याने गोलंदाजी करताना ४ षटकात २० धावा देत १ विकेट आपल्या नावावर केली. विशेष म्हणजे, नारायणने आधीच आयपीएलमधील आपल्या १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे तो आता आयपीएलमध्ये १०००हून अधिक धावा आणि १०० हून अधिक विकेट्स घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.
Sunil Narine completes 1000 runs in the IPL.
Departs after a handy knock of 22 off 12 deliveries.#TATAIPL pic.twitter.com/96O9Kw9x0H
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
त्याच्याव्यतिरिक्त हा कारनामा भारत आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने केला आहे. तसेच, नारायणच्याच देशाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोनेही या खास कारनाम्यावर आपले नाव कोरले आहे.
सुनील नारायणची आयपीएल कारकीर्द
सुनील नारायणने आतापर्यंत १४५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ८३ डावात फलंदाजी करताना १४.७५च्या सरासरीने १००३ धावा केल्या आहेत. तसेच, त्याने १४४ डावात गोलंदाजी करताना ६.६३च्या इकॉनॉमी रेटने १५१ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये १००० हून अधिक धावा आणि १०० हून अधिक विकेट्स घेणारे खेळाडू
रवींद्र जडेजा
ड्वेन ब्रावो
सुनील नारायण*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानसाठी जोसच बॉस! १५ वर्षांच्या आयपीएल इतिहासात कुणालाही न जमलेला रेकॉर्ड दाखवला करून
‘माझ्यासोबत योग्य झालं नाही, मला वाईट वागणूक दिली’, आयपीएलबद्दलच्या भावनांना ख्रिस गेलकडून मोकळी वाट