---Advertisement---

नेहमीच आरसीबीचा कर्दनकाळ ठरतो नरीन; बनला अशी कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय गोलंदाज

On: मंगळवार, ऑक्टोबर 12, 2021 12:09 AM
---Advertisement---

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल २०२१) तेराव्या हंगामातील एलिमेनेटरचा सामना सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. शारजा क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेले १३९ धावांचे आव्हान कोलकाताने अखेरच्या षटकात पार केले. कोलकाताचा सुनील नरीन सामन्याचा मानकरी ठरला. या सामन्यात त्याने घेतलेल्या चार बळींसह त्याने बेंगलोरविरुद्ध एका नव्या विक्रमाची नोंद केली.

नरीनचा अष्टपैलू खेळ
‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीतील या सामन्यात बेंगलोरसाठी देवदत्त पडिक्कल व कर्णधार विराट कोहली यांनी पावर प्लेमध्ये ४९ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या नरीनने अप्रतिम गोलंदाजी करत कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल व श्रीकर भारत या चार फलंदाजांना अवघ्या २१ धावांमध्ये तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याने फलंदाजीतही १५ चेंडूत २६ धावा काढून संघाला विजयाच्या नजिक नेले.

आरसीबीचा कर्दनकाळ नरीन
सुनील नरीनने या सामन्यात चार बळी घेताना बेंगलोरविरुद्ध तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली. बेंगलोरविरुद्ध तीन वेळा ४ बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याने २०१४ हंगामात दोन्ही वेळा त्याने अशी कामगिरी केलेली. त्यानंतर, सात वर्षानंतर त्याने बेंगलोरविरुद्ध ४ गडी बाद केले.

कोलकाताचा क्वालिफायरमध्ये प्रवेश
बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पावर प्लेमध्ये शानदार सलामी दिल्यानंतर बेंगलोरचा डाव ढेपाळला. डिव्हिलियर्स व मॅक्सवेल हे प्रमुख खेळाडू अपयशी ठरल्याने बेंगलोरला निर्धारित २० षटकात केवळ १३८ धावा काढता आल्या. कोलकातासाठी सुनील नरीनने चार व लॉकी फर्ग्युसनने दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरात, शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर व सुनील नरीन यांनी उपयुक्त खेळ्या करत संघाला विजयाच्या जवळ नेले. शकीब अल हसन आणि कर्णधार ओएन मॉर्गन यांनीअखेरपर्यंत संयमाने खेळत संघाला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला. कोलकाता आता क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्सशी भिडेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---