---Advertisement---

केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाला ‘बापमाणसा’कडून हिरवा कंदील, प्रतिक्रिया वाचून तुमचीही पटेल खात्री!

On: सोमवार, एप्रिल 19, 2021 3:51 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलने काल (१८ एप्रिल ) आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्यावर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तसेच त्याची चर्चेत असणारी गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हीने देखील त्याला फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर अथियाच्या पोस्टवर वडील सुनील शेट्टीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाढदिवसाच्या दिवशी केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सामना खेळण्यात व्यस्त होता. हा सामना पंजाब किंग्ज संघाने गमावला तरी देखील त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तर झाले असे की, राहुलची चर्चेत असलेली गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध अभिनेत्री अथिया हीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर राहुलला शुभेच्छा देण्यासाठी आपले काही फोटो शेअर केले होते. ज्यावर तिने कॅप्शन म्हणून , ‘मी तुझी खूप आभारी आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ असे लिहिले होते.

https://www.instagram.com/p/CNzH2XRnupL/?igshid=1r1fnv91jsap

या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या. पण एक विशेष प्रतिक्रीया चर्चेचा विषय बनून आहे. या फोटोवर अथिया शेट्टीचे वडील आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘खरंच’ आणि पुढे एक हार्ट ची ईमोजी देखील टाकली होती.

सुनील शेट्टीने दिलेली प्रतिक्रिया पाहून एका युजरने लिहिले की, ‘मिठाई वाटा, विवाह ठरला आहे. ‘यावर एका युजरने प्रतिक्रीया देत लिहिले होते की, ‘विवाह केव्हा करणार आहात.?’

Photo Courtesy: Instagram/@athiyashetty

अथियाच्या वडिलांना आणि आईला केएल राहुल आवडतो. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. तसेच सुनील शेट्टीचे स्पष्ट म्हणणे आहे की, तिला जो कोणी आवडत असेल त्याच्यासोबतच तिचा विवाह केला जाईल. गेल्या कित्येक महिन्यांपासून या दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. दोघेही एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात. मात्र अद्यार याबाबत त्यांनी कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या-

विरोधकांना फुटला घाम; धुव्वादार फलंदाजी करणारा ‘हा’ शिलेदार करतोय टी२० विश्वचषकाची तयारी

सुटला, सुटला.. हुश्श पकडला..! सर्वत्र रंगली दीपक हुडाच्या ‘सोडपकड’ कॅचची चर्चा

‘यंदा आयपीएल ट्रॉफी किंग कोहलीचं जिंकणार,’ इंग्लंडच्या माजी कर्णधाराला आहे विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---