भारताकडे सध्या कुलदिप यादव आणि युझवेंद्र चहल हे दोन प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यासोबतच आयपीएल देखील गाजवले आहे. परंतू आता याच कुलदीप यादव आणि चहलच्या जागी भारताच्या नव्या दमाच्या फिरकीपटूला स्थान दिले पाहिजे, असे मत महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
सुनिल गावस्कर यांनी येणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 बद्दल बोलताना असे म्हटले आहे की, येणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी कुलदीप यादव आणि युदवेंद्र चहलपेक्षा लेग स्पिनरच्या रूपात रवी बिष्णोईला निवडले पाहिजे. कारण कुलदीप आणि चहलपेक्षा बिष्णोई क्षेत्ररक्षण चांगले करतो आणि संघाला खालच्या फळीत फलंदाज म्हणूनही योगदान देऊ शकतो. रवी बिष्णोईने टी20च्या मागील काही सामन्यांत चांगले प्रदर्शन केले आहे. यादरम्यान कुलदीप यादव हा संघात आल्यापासून विष्णोईला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेले नाही.
अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये जून महिन्यात टी20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत अनेकांचे लक्ष भारतीय संघावर राहणार आहे. टी20 विश्वचषकासाठी संघाची निवड करताना निवडकर्ते कठोर निर्णय घेऊ शकतात आणि त्यामध्ये कोणत्या फिरकीपटूला स्थान दिले जाईल हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारताकडे सध्या रवी बिश्नोई, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, वॉशिंटन सुंदर आणि अक्षर पटेल असे बरेचं पर्याय आहेत.
विष्णोईचे टी20 विश्वचषकातील महत्त्व अधोरेखित करताना गावसकर म्हणाले, ‘लेग स्पिलरच्या रूपात रवी बिश्नोईला संघात निवडणे महत्त्वाचे ठरले कारण, तो कुलदीप-चहलपेक्षा क्षेत्ररक्षणात चांगला आहे. त्यातचं तो उत्कृष्ट गोलंदाजी पण करतो आणि टीमसाठी खालच्या फळीत फलंदाजी सुद्धा करु शकतो. तसेच त्याच्या शांत स्वभावामुळे त्याने गतवर्षी झालेल्या आयपीएल(IPL) मध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. मला वाटतंय की, त्याने आणि आवेश खानने आरसीबी विरुद्ध आपल्या संघाला विजयी मिळवून दिला होता. त्यामुळे माझ्यासाठी ‘रवी बिश्नोई’ प्रथम पर्याय असेल.’
हेही लगेच वाचा
IND vs AFG । पहिल्या टी20तून विराटनंतर जयस्वालची माघार, नाणेफेक जिंकून रोहितने घेतली गोलंदाजी
Video: चाहत्यानी सर्वांसमोरच धरले राहुलचे पाय, यष्टीरक्षकाच्या कृतीने जिंकली लोकांची मने