---Advertisement---

Mitchell McClenaghan । IPL ट्रॉफी तिनदा जिंकणाऱ्या खेळाडू पुन्हा मुंबई इंडियन्ससोबत

mitchell mcclenaghan
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन पुन्हा एकदा मुंबई फ्रँचायझीसोबत जोडला गेला आहे. यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीग म्हणजेच आंतरराष्ट्रीय लीग टी-20मध्ये मुंबई फ्रँचायझीच्या मालकिचा एमआय एमिरेट्स संघ आहे. आयएलटी-20 लीगच्या आगामी हंगामात एमआय एमिरेट्स संघात मिचेल मॅक्लेनघन याला महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मिचेल मॅक्लेनघन (mitchell mcclenaghan) न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज राहिला आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणझेच आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी महत्वाची भूमिका पार पाडली. मुंबई इंडियन्सने जिंकलेल्या पाच आयपीएल ट्रॉफींपैकी तीन ट्रॉफी मॅक्लेनघनच्या उपस्थितीत उंचावल्या. आयपीएल 2019 हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम ठरला. 2015 मध्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले आणि 2019 नंतर तो पुन्हा कधी आयपीएल खेळला नाही. मुंबई इंडियन्ससाठी मॅक्लेनघनने 56 सामन्यांमध्ये 25च्या सरासरीने 71 विकेट्स घेतल्या आहेत.

यूएईमध्ये आयोजित आयएलसी-20 ही लीग येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. एमआय एमिरेट्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी मिचेल मॅक्लेनघन याला नियुक्त केले गेले आहे. आगामी आयएलसी हंगामात त्याच्या मार्गदर्शनात एमआय एमिरेट्सच्या गोलंदाजांचे प्रदर्शन कसे राहते, हे पाहण्यासारखे असेल.

मॅक्लेनघनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने न्यूझीलंडसाठी शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला. 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या वेगवान गोलंदाजना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये 48 सामन्यांमध्ये 82 विकेट्स घेतल्या आहेत.

एमआय एमिरेट्स संघासाठी मॅक्लेनघनने आपली जबाबदारी स्वीकारली आहे. 19 जानेवारी रोजी ही लीग सुरू होणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉबिन सिंग असून त्यांच्यासोबत मॅक्लेनघन गोलंदाजी प्रशिक्षकाचे काम करणार आहे. आयएलसी20 लीगचा पहिला हंगाम मागच्या वर्षी खेळली गेला होता. त्यावेळ रॉबिन सिंग एमआय एमिरेट्सचे व्यवस्थापनक देखील होते. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अजय जडेजा एमआय एमिरेट्ससाठी फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पाहणार आहेत. तसेच विनय कुमार सहायक प्रशिक्षक आहेत. जेम्स फ्रँकलिन क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. (mumbai indians ex fast bowler mitchell mcclenaghan mi emirates bowling coach in ilt20)

महत्वाच्या बातम्या – 
Shivam Dube । ‘आम्हाला माहीत आहे…’, सामनावीर ठरलेल्या दुबेला रोहित काय म्हणाला?
नुसता धुराळा! क्रिकेटचा सामना खेळायला डेविड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---