बॉलिवुड आणि क्रिकेटच एक वेगळं नातं आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून बॉलिवुड सेलिब्रिटी क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी येत असतात. अशातच अबू धाबी टी१० लीग स्पर्धेत देखील शनिवारी (२७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्रीने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शनिवारी (२७ नोव्हेंबर)अबू धाबी टी१० लीग स्पर्धेत झालेल्या सामन्यात दिल्ली बुल्स आणि डेक्कन ग्लेडीएटर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस तर पाहायला मिळालाच. यासह हा सामना खास होण्याचे आणखी एक मोठे कारण देखील होते. हा सामना पाहण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री सनी लियोनीने तिचा पती डॅनिएल वेबरसह हजेरी लावली होती. ती दिल्ली बुल्स संघाला समर्थन करताना दिसून आली.
सनी लियोनीने आपल्या पतीसह स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याचा आनंद घेतला. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती दिल्ली बुल्स संघाची जर्सी घालून स्टँड्समधून चीयर करताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिने दिल्ली बुल्स संघाच्या चाहत्यांना खास मेसेज देखील दिला आहे.
तसेच जेव्हा तिला विचारण्यात आले की, दिल्ली बुल्स संघातील तुझा सर्वात आवडता खेळाडू कोण आहे? त्यावेळी तिने चॅम्पियन चॅम्पियन गाणं गात, ड्वेन ब्रावोचे नाव घेतले. या सामन्यात दिल्ली बुल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरीदेखील तिच्या उत्साहात कुठलीच कमतरता जाणवली नाही.
Things you'd love to see. 🤗🙌@SunnyLeone, team owner @neeleshdxb cheering the Bulls to victory last night. 👏
🎥 Video: @T10League#DilSeDilli #DelhiBulls #AbuDhabiT10 #CricketsFastestFormat #Cricket pic.twitter.com/JZxGZuF9jo
— Delhi Bulls (@DelhiBullsT10) November 26, 2021
Who do we have here cheering for the Bulls tonight? 🤩
The one & only @SunnyLeone is in the house. 🙌@T10League #DilSeDilli #DelhiBulls #AbuDhabiT10 #CricketsFastestFormat #Cricket pic.twitter.com/C2b5H0NrF3
— Delhi Bulls (@DelhiBullsT10) November 25, 2021
या सामन्यात डेक्कन ग्लेडीएटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर दिल्ली बुल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोमारिओ शेफर्डने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली, तर डॉमिनिक ड्रेक्सने १६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर दिल्ली बुल्स संघाला १० षटक अखेर ६ बाद ९४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना डेक्कन ग्लेडीएटर्स संघाकडून टॉम बेंटनने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर नजीबुल्लाह जदरानला ३५ धावा करण्यात यश आले. हा सामना डेक्कन ग्लेडीएटर्स संघाने ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
कडक ना भावा!! भारताविरुद्ध विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करत साउदीची दिग्गज खेळाडूशी बरोबरी
पुजाराला बाद करताच जेमिसनचा मोठा विक्रम, २० व्या शतकापासून ‘असा’ पराक्रम करणारा तिसराच
फुटलं ना डोकं! सीमारेषेवरून क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू थेट पंचाच्या डोक्यात, व्हिडिओ पाहाच