आपल्या सर्वांना माहिती आहे की, कोरोना व्हायरसमुळे भारताबरोबर इतर बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये क्रीडा स्पर्धाही स्थगित किंवा रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. जवळपास सर्वच क्रिकेटपटू वेळ घालविण्यासाठी सोशल मीडियावर लाईव्ह चॅटचा आनंद घेत आहेत.
अशाच प्रकारे वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज खेळाडू ड्वेन ब्रावोनेदेखील अभिनेत्री सनी लियॉनबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधला.
यादरम्यान ब्रावो (Dwayne Bravo) आणि सनी (Sunny Leone) दोघेही डान्स (Dance) करतानाही दिसले. दोघांचाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ब्रावोने सनीबरोबर आपल्या गाण्यांवरही डान्स करत चाहत्यांची मने जिंकली.
सनी सध्याच्या काळात आपल्या डान्ससाठी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे. तिने बॉलिवूड किंग शाहरूख खानबरोबर रईस या चित्रपटात काम केले आहे.
तसेच ब्रावो नेहमी अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. ब्रावो आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या मैत्रीची क्रिकेट जगतात चर्चा सुरु असते. नुकतेच ब्रावोने धोनीसाठी एक गाणेदेखील तयार केले आहे. आयपीएलमध्ये ब्रावो चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या संघाचा भाग आहे. आयपीएलमध्ये जेव्हाही शेवटच्या षटकांची चर्चा होते, तेव्हा ब्रावोचे नाव घेतले जाते.
https://www.youtube.com/watch?v=j2_GdiI2NAU&feature=emb_logo
त्याने नुकत्याच एका मुलाखतीत धोनीला आपला भाऊ म्हटले होते. तो म्हणाला होता की, “धोनी नेहमीच खेळाडूंना पाठिंबा देतो आणि कधीच वाईट काळात साथ सोडत नाही.” तरी २०१९च्या आयपीएलमध्ये शेन वॉट्सन (Shane Watson) पूर्ण मोसमात फॉर्ममध्ये नव्हता. परंतु अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत सीएसकेला विजयाच्या जवळ पोहोचवले होते.
https://www.youtube.com/watch?v=qeSCBwZsTN8
आयपीएल २०१९मध्ये अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर सीएसकेला विजय मिळवता आला नाही. परंतु वॉट्सनच्या खेळीमुळे सीएसकेने सामना जवळ-जवळ जिंकला होता. वॉट्सननेही धोनीची प्रशंसा केली होती. तो म्हणाला होता की, तो जोपर्यंत आयपीएलमध्ये खेळणार आहे. तोपर्यंत त्याला सीएसके संघाकडून खेळायचे आहे.
@SunnyLeone Challenges Dwayne Bravo To Dance During Her Instagram Live Session #DwayneBravo #SunnyLeone #InstagramLive
— World Cricket Live (@world_cric_live) April 30, 2020
कोविड-१९मुळे आयपीएल २०२०चा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यावर्षी आयपीएलच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहितला ‘व्हाईट बॉल क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन’ म्हणण्याचं कारणं नक्की आहे तरी काय
-धोनी मदत करतो पण अर्धवट, धोनीचा प्रतिस्पर्धी खेळाडूचे भाष्य
-नशीब चांगले म्हणून टीम इंडियाला मिळणार तब्बल ७ कोटी रुपये?