---Advertisement---

खुशखबर! सनरायझर्स हैदराबादचा ‘यॉर्करकिंग’ बनला ‘बापमाणूस’

On: शनिवार, नोव्हेंबर 7, 2020 3:57 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 च्या दुसऱ्या ‘प्ले ऑफ’ सामन्यात एबी डिविलियर्सला ‘क्लीन बॉल्ड’ करून सनरायझर्स हैदराबादचा युवा गोलंदाज टी नटराजन चर्चेत आला होता. त्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. युएई येथे आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या नटराजनच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

आयपीएल 2020 चे अवघे दोनच सामने आता बाकी राहिले असून सर्व खेळाडू मोठ्या कालावधीनंतर आपापल्या घरी आपल्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहेत. याला अपवाद आहेत ते म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणारे खेळाडू.

नटराजनची पत्नी पवित्रा हिने एका बाळाला जन्म दिला असून नटराजन आता बाप बनला आहे. सामन्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरनेदेखील नटराजनचे अभिनंदन केले आहे. बाप झाल्यानंतर नटराजन प्रचंड खुश असून त्याला आतापासूनच त्याच्या परिवाराला भेटण्याची ओढ निर्माण झाली आहे.

https://twitter.com/SunRisers/status/1324835825834708992

नटराजन ने आयपीएल 2020 च्या हंगामात आपल्या संघासाठी आतापर्यंत 16 बळी घेतले आहेत. सोबतच तो रविवारी (८ नोव्हेंबर) दिल्लीविरुद्ध होणाऱ्या ‘क्वालिफायर 2’ सामन्याची तयारी करत आहे. या सामन्यातही तो उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या प्रतिक्षेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आनंदाची बातमी! ‘या’ छोट्या शहरात सुरु होतेय एमएस धोनीची क्रिकेट अकॅडेमी

-नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ

-“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली

ट्रेंडिंग लेख-

-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

-बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---