नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) मेगा लिलाव (Mega Auction) बंगळुरू येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने प्रतिभाशाली खेळाडूंना आपल्या ताफ्यात विकत घेतले आहे. आयपीएलचा एकवेळचा विजेता सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघानेही काही मोठ्या नावांवर बोली लावल्या आहेत. मात्र मेगा लिलावाच्या काही दिवसांनंतरच हैदराबाद संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचे साहाय्यक प्रशिक्षक (Sunrisers Hyderabad Assistant Coach) सायमन कॅटिच (Simon Katich) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Simon Katich Steps Down) दिला आहे.
द ऑस्ट्रेलियनने दिलेल्या वृत्तानुसार, साहाय्यक प्रशिक्षक सायमन हे ज्या पद्धतीने संघ चालवला जात आहे, त्या पद्धतीशी नाखुश होते. तसेच मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या खरेदीसाठी ज्या योजना आखल्या गेल्या होत्या, त्यांचीही अंमलबजावणी झाली नाही. याच कारणामुळे त्यांनी हैदराबाद संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सायमन यांच्या अशा तडकाफडकी राजीनाम्यानंतर हैदराबादचा संघ मात्र अडचणीत सापडला आहे. क्रिकेटचाहत्यांनी हैदराबाद संघावर प्रश्न करायला सुरुवात केली आहे. कारण गेल्या एक वर्षभरात चक्क ३ प्रशिक्षकांनी हैदराबाद संघाची साथ सोडली आहे. याखेरीज त्यांच्या डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकणे आणि त्यानंतर संघाबाहेर करण्याच्या निर्णयांवरूनही हैदराबाद संघावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. यामुळे हैदराबाद संघाची मालकिण काव्या मारन (Kavya Maran) संघाला व्यवस्थित सांभाळू शकत नसल्याची जहरी टीका चाहते करताना दिसत आहेत.
हेही वाचा- डिविलियर्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खास मित्र विराटने का म्हणले ‘बिस्टिक’? जाणून घ्या कारण
गेल्या वर्षभरात राजीनामा दिलेले प्रशिक्षक
सायमन यांच्यापूर्वी ट्रेवर बेलिस आणि ब्रॅड हेडिन यांनीही हैदराबाद संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बरीच वर्षे व्यवस्थितरित्या या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. परंतु आता ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष बनले असल्याने ते हैदराबाद संघातून वेगळे झाले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद –
उर्वरित किंमत – १० लाख
संघातील खेळाडू – २३ (परदेशी ८)
संघ – केन विलियमसन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जे सुचिथ, एडेन मार्करम, मार्को जॅन्सेन, रोमॅरियो शेफर्ड, सीन ऍबॉट, रविकुमार समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा युवराज सिंगला झटका, गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली
विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा