---Advertisement---

SRH च्या गोटात झोंबले ‘वाथी कमिंग’चे वारे; पाहा वॉर्नर, भुवी अन् राशिदचा झक्कास डान्स

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 8:14 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ ला ९ एप्रिलला सुरुवात झाली. रविवार दिनांक ११ एप्रिलला सनराययझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये सामना झाला. त्यात कोलकाता संघाने हैद्राबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. या परभावनंतर निराश न होता हैद्राबाद संघातील कर्णधार डेविड वॉर्नरने संघ सहकाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसला. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे.

सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नामकरण तेलंगणा राज्याची राजधानी असणाऱ्या हैद्राबाद  शहरावरुन करण्यात आले आहे. हैद्राबाद हे दक्षिण भारतात वसलेल शहर आहे. दक्षिण भारतात चित्रपटांची मोठी क्रेझ आहे. चित्रपटप्रेमी आणि क्रिकेटप्रेमींची साथ मिळाली की दक्षिण भारतीय लोक अधिकच आनंदी होतात. आता त्याच्याच आधाराने हैद्राबाद संघाने प्रसिद्ध तमिळ गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे.

दक्षिण भारतात अभिनेता विजय थालापती मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. त्याचे वाथी कमिंग नावाचे गाणे सध्याच्या घडीला खूप प्रसिद्ध असल्यामुळे डेविज वॉर्नर, राशिद खान आणि भुवनेश्वर कुमार यांनी मिळून त्या गाण्यावर डान्स केला आहे. भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी डेविड वार्नरला नाचण्यात चांगली साथ दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत असून याला हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाल्या आहेत.

सनराइजर्स हैदराबादचा पुढील सामना १४ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे. एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. बेंगलोरने त्यांचा हंगामातील पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली होती. तर हैदराबादला पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड लागले होते. त्यामुळे हा येता दुसरा सामना जिंकत दमदार पुनरागमन करण्याचा हैदराबाद संघाचा मानस असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत,” पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसन झाला भावूक

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे आयपीएलमधील ‘षटकार किंग’, हा विक्रम पाहून विश्वास बसेल.

भारीच! २० चेंडूत अर्धशतक करणाऱ्या दीपक हुडाने ‘या’ विक्रमाच्या यादीत केली विरेंद्र सेहवाग, हार्दिक पंड्याची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---