भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज वीवीएस लक्ष्मण यांना एक नवीन जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे. वीवीएस लक्ष्मण यांना राष्ट्रीट क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) प्रमुख पदाची जबाबदारी दिली जाण्याची माहीती समोर येत आहे. आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने या गोष्टीची पुष्टी केली आहे. लक्ष्मण यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघासोबत मेंटॉरची भूमिका पार पाडत होते. मात्र, आता ते ही जबाबदारी पार पाडू शकणार नाहीत, अशी माहिती सनरायझर्स हैदराबादने दिली आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, लक्ष्मण यांनी हैदराबाद संघाच्या व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली आहे की, त्यांनी एनसीएसच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. असे असले तरीही बीसीसीआयने अद्याप याबाबात कसलीही माहिती दिलेली नाही.
यापूर्वी एनसीएच्या प्रमुखपदाची जबाबदारी राहुल द्रविड यांच्यावर होती. पण रवी शांस्त्रींचा भारतीय संघासोबतचा कार्यंकाळ संपला आणि त्यांच्या जागी द्रविड यांना भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक केले गेले आहे. अशात एनसीए प्रमुख पदासाठी नवीन नावाची नियुक्ती करणे आवश्यक होते. लक्ष्मण यांचे नाव ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत होते. आता सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या माहितनंतर लक्ष्मण यांची या पदावर नियुक्ती निश्चित असल्याचे मानले जात आहे.
लक्ष्मण यांनी स्वतःही अध्याप याबाबत कसलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत अनधिकृतपणे पद्धतीने माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले आहे की, “वीवीएस लक्ष्मण एनसीएचे नवीन अध्यक्ष असतील. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण यांनी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मेंटॉरपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे.
पुढच्या ४ डिसेंबरला कोलकातामध्ये बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैढकीआधी वीवीएस लक्ष्मण एनसीएसच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील, अशीही माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, ६०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाऐवजी ‘या’ बॉलरची निवड
टी२० विश्वचषकातून वगळण्याबाबत भारताच्या चहलने सोडले मौन; म्हणाला, “मला ४ वर्षे संघाबाहेर…”
न्यूझीलंडविरुद्ध पाहायला मिळणार रोहितचा ‘हिटमॅन’ अवतार! विराट, गप्टिलला पछाडत करणार भीमपराक्रम