---Advertisement---

ट्विटर वॉर!! धुव्वांदार विजयानंतर हैदराबादने राजस्थानला डिवचलं, ‘असा’ घेतला बिर्यानीचा बदला

---Advertisement---

गुरुवारी (२२ ऑक्टोबर) आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मनिष पांडे (४७ चेंडू ८३ धावा) आणि विजय शंकरच्या (५१ चेंडू ५२ धावा) धुव्वांदार शतकी भागिदारीमुळे राजस्थान रॉयल्सला ८ विकेट्सने मात दिली. यासह हैदराबादने या हंगामात यापुर्वी राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढला. त्यामुळे आताच्या दमदार विजयानंतर हैदराबाद संघाने ट्विटरवर राजस्थानला ट्रोल केले.

झाले असे की, या हंगामात यापुर्वी ११ ऑक्टोबरला हैदराबाद आणि राजस्थान संघात आयपीएल सामना झाला होता. त्या सामन्यात राजस्थानने हैदराबादला ५ विकेट्सने चितपट केले होते. त्यानंतर त्यांनी ट्विट करत लिहिले होते की, “झोमॅटो. आम्हाला एक मोठी हैदराबादी बिर्यानी ऑडर करायची आहे. पत्ता आहे, फक्त नि फक्त रॉयल मिराज.”

आता हैदराबादने गुरुवारी राजस्थानला पराभूत केल्यानंतर या ट्विटला प्रत्युत्तर देत लिहिले की, “बिर्यानीची ऑर्डर रद्द करा. आमचे मित्र एवढं तिखट सहन करु शकणार नाहीत. त्यांच्यासाठी डाळ बाटी खाणे चांगले राहिल.”

एवढ्यावरच हैरदाबाद संघ थांबला नाही. तर त्यांनी पुढेही राजस्थानची मजा घेत लिहिले की, “आज रात्री भूक लागली नसेल.” यावर राजस्थान निशब्द झाला आणि त्यांनी हैदराबादला काही उत्तर दिले नाही.

https://twitter.com/SunRisers/status/1319330877650931712?s=20

https://twitter.com/SunRisers/status/1319329839862534145?s=20

https://twitter.com/SunRisers/status/1319333410284908561?s=20

गुरुवारी हैदराबाद विरुद्ध राजस्थान संघातील सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादने १८.१ षटकातच १५६ धावा करत राजस्थानचे लक्ष्य पूर्ण केले. यासह हंगामातील चौथा विजय नोंदवत ८ गुणांसह हैदराबाद संघ गुणतालिकेत ५व्या स्थानावर आला आहे. तर राजस्थान शेवटून दूसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

CSK चाहत्यांनो नाराज होऊ नका! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, अशी आहेत समीकरणे

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

“आर्चरने तिसरे षटक फेकले असते तर…”, राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर मनीष पांडेची प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

चेन्नईचे तारणहार बनण्यास तयार आहेत ४ युवा प्रतिभावान खेळाडू ; मुंबईविरुद्ध मिळणार संधी?

आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज

आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---