येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी, 7 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघानं त्यांच्या नव्या जर्सीचं अनावरण केलं. टीमनं त्यांच्या जर्सीवर नेहमीच्या नारिंगी टोनसह, काळा पॅटर्न वापरला आहे. सनरायझर्स हैदराबादची नवीन जर्सी SA 20 लीगचा अत्यंत यशस्वी संघ ‘सनरायझर्स इस्टर्न केप’च्या (SEC) जर्सीसारखी दिसते.
सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्या नव्या जर्सीला ‘फायरी हीट’ असं नाव दिलं आहे. या नवीन जर्सीला संपूर्ण केशरी रंगाचा बेस आणि त्यावर काळ्या रंगाचा पॅटर्न आहे. हे काळ्या रंगाचे डिझाइन्स जर्सीला एक विशिष्ट आणि आकर्षक स्वरूप देतात. जर्सीच्या तळाशी नारिंगी पट्ट्यासह काळ्या रंगाचा लोअर आहे.
Ready to unleash the fiery heat of Hyderabad 🔥
Our 🆕 blazing armour for #IPL2024 🧡 #PlayWithFire pic.twitter.com/mMQ5SMQH6O
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 7, 2024
आम्ही तुम्हाला सांगतो की, ही जर्सी हुबेहुब सनरायझर्स इस्टर्न केपच्या जर्सीसारखी दिसते. विशेष म्हणजे, एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स इस्टर्न केपनं 2023 आणि 2024 मध्ये SA 20 लीग जिंकली आहे.
सनरायझर्स हैदराबादनं IPL 2024 पूर्वी आपला कर्णधार बदलला आहे. फ्रँचायझीनं नुकतीच ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सची आगामी हंगामासाठी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. आयपीएल लिलावात सनरायझर्सनं कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यासह कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. गेल्या हंगामात संघाचं नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमनं केलं होतं. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादची टीम स्पर्धेमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकली नाही.
सनरायझर्स हैदराबादची टीम
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, मार्को यान्सन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेद सुब्रमण्यम.
महत्त्वाच्या बातम्या-
सामन्यादरम्यान मिळाली होती गळा कापण्याची धमकी! जाणून घ्या युवराज सिंगच्या विक्रमी 6 षटकारांची कहानी
अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
महिला क्रिकेटची सुपरस्टार हरमनप्रीत कौरचा आज वाढदिवस, विराट-धोनी नाही तर ‘या’ खेळाडूला मानते आदर्श