बीसीसीआय आयपीएल मेगा लिलावासाठी सज्ज आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव शक्य असल्याचे मानले जात आहे. परंतु आतापर्यंत आयपीएलमधील सर्व संघ मेगा लिलावावर एकमत होऊ शकले नाहीत. वास्तविक, आयपीएल मालकांची यावर वेगवेगळी मते आहेत. याशिवाय, आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर नियमासह इतर अनेक मुद्द्यांवर बीसीसीआय आणि संघ मालकांमध्ये वाद आहेत. दरम्यान, आता सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनची नाराजी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन बीसीसीआयच्या नियमांवर खूप नाराज आहे. क्रिकबझच्या बातमीनुसार, काव्या मारनने बीसीसीआयसोबत संघ मालकांच्या बैठकीनंतर नियमांवर नाराजी व्यक्त केली. काव्या मारन म्हणाली की, संघ तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो, त्याआधी खूप विचारमंथन करावे लागते, तरुण खेळाडूंवर गुंतवणूक करावी लागते, तरुण खेळाडूंना चांगले बनवण्यासाठी वेळ लागतो. अशा परिस्थितीत, मेगा लिलाव योग्य नाही कारण लिलावात आपले खेळाडू लिलावात इतर संघांचा भाग बनतात. या आधी तुम्ही त्या तरुण खेळाडूंमध्ये गुंतवणूक करता.
यानंतर काव्या मारनने सनरायझर्स हैदराबादचा युवा खेळाडू अभिषेक शर्माचे उदाहरण दिले. काव्या मारन म्हणते की, अभिषेक शर्माला तयार करण्यासाठी 3 वर्षे लागली. आम्ही या खेळाडूला 3 वर्षे तयार केले आणि त्याला चांगले बनवले. आता अभिषेक शर्मा आमच्यासाठी चांगली कामगिरी करत आहे, पण यामागे आमची मेहनत आहे. ती पुढे म्हणाली की अभिषेक शर्मा हे एकमेव उदाहरण नाही, इतर संघांमध्येही अशी उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन मेगा लिलावाच्या बाजूने नाही. काव्या मारनच्या या निर्णयावर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान राॅयल्स या संघाचा देखील होकार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील ऐतिहासिक सामना; प्रथमच दोन भारतीय आमने-सामने
रिटेन्शन नियमांबाबात संघ मालकांतच ‘हमरी-तुम्हरी’; जाणून घ्या बीसीसीआय आणि फ्रेंचायझीच्या बैठकीत काय झाले?
‘तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण?’, समोरुन प्रश्न येताच धोनीचे क्षणात उत्तर….