१९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाची सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
शुक्रवारपर्यंत आयपीएल २०२०चे एकूण ७ सामने पार पडले आहेत. या सातही सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघांच्या कर्णधारांनी धोनीची परंपरा पुढे नेत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेतला. परंतु आज (२६ सप्टेंबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराइझर्स हैदराबाद संघातील सामन्यात याउलट गोष्ट पाहायला मिळाली.
आयपीएलच्या या ८व्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह हैदराबाद संघ हा आयपीएलच्या तेराव्या हंगामात नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा पहिलाच संघ ठरला. Sunrisers Hydrabad Become First Team Who Opted Batting
नाणेफेक जिंकल्यानंतर आतापर्यंतच्या सर्व संघांनी घेतलेले निर्णय
पहिला सामना- चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
दूसरा सामना- किंग्स इलेव्हन पंजाब, क्षेत्ररक्षण
तिसरा सामना- सनराइझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण
चौथा सामना- चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
पाचवा सामना- कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण
सहावा सामना- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, क्षेत्ररक्षण
सातवा सामना- चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण
आठवा सामना- सनराइझर्स हैदराबाद, फलंदाजी
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ व्यक्तीला वाटतेय जडेजा आणि पियुष चावलाच्या फॉर्मची चिंता
क्रिकेट समालोचकांनी शोधून काढली सीएसकेच्या पराभवाची कारणे, वाचा
IPL अपडेट : पाहा ७ सामन्यानंतर आयपीएलचा गुणफलक, तर ‘हे’ खेळाडू ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे
असा कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी