---Advertisement---

“सीएसकेच्या फलंदाजांनी ग्लुकोज घेऊनच मैदानात या,” दिग्गजाने साधला निशाणा

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 8:08 PM
---Advertisement---

शुक्रवारी (२५ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२०चा सातवा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने दमदार प्रदर्शन करत ४४ धावांनी विजय मिळवला.

दिल्लीच्या या विजयात सलमीवीर फलंदाज पृथ्वी शॉने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४३ चेंडूत ६४ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्याव्यतिरिक्त रिषभ पंत (३७ धावा), शिखर धवन (३५ धावा) आणि श्रेयस अय्यरनेही (२६ धावा) चांगले फलंदाजी प्रदर्शन केले.

याउलट एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघातील फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक मजेशीर ट्विट केले आहे.

सेहवागने ट्विटमध्ये लिहिले की, “चेन्नईचे फलंदाज सहज धावा करू शकले नाहीत. त्यांना इथून पुढील सामन्यात ग्लुकोज चढवून फलंदाजी करावी लागणार आहे.”

 

सेहवागचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सेहवागच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तुझे म्हणणे बरोबर आहे, असे म्हणत सेहवागचे समर्थन केले आहे. तर काहींनी चेन्नई संघ चुका सुधारत पुन्हा दमदार पुनरागमन करेल, अश्या कमेंट केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL अपडेट : पाहा ७ सामन्यानंतर आयपीएलचा गुणफलक, तर ‘हे’ खेळाडू ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी

रोहित शर्माची एक बॅट किती दिवस टिकते तुम्हाला माहिती आहे का?

चाहते करतायत मिस्टर आयपीएल रैनाच्या पुनरागमनाची विंनती, सीएसकेच्या सीईओने दिले ‘हे’ उत्तर 

ट्रेंडिंग लेख-

क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

एका चुकीने करिअर संपलं, नाहीतर आज असता जगातील सर्वोत्तम कर्णधार

असा कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---