जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव नुकताच बेंगलोर येथे पार पडला. या लिलावात सर्व संघांनी आपल्या संघाची बांधणी केली. २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने या लिलावात अनेक शानदार खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानंतर आता हैदराबादच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काही आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळांच्या बातमीनुसार, युवा अष्टपैलू अभिषेक शर्मा याच्या खांद्यावर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबाद आगामी आयपीएल हंगामात केन विलियम्सनचा उत्तराधिकारी म्हणून युवा अष्टपैलू अभिषेक शर्मा याला उपकर्णधारपद देऊ शकते. केन विलियम्सन सातत्याने दुखापतग्रस्त असतो. अशा परिस्थितीत काही सामन्यात अभिषेक संघाची धुरा वाहतानाही दिसू शकतो. नुकतीच अभिषेक याची पंजाब रणजी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २१ वर्षीय अभिषेक २०१८ मध्ये भारताच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख सदस्य राहिला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे मेंटर मुथय्या मुरलीधरन यांनी आगामी हंगामात अभिषेक सलामीवीराची जबाबदारी निभावणार असल्याचे देखील सांगितले होते.
अभिषेक शर्मा याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वेळा पंजाब संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. यावेळी आयपीएल लिलावात त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये जोरदार लढत रंगली. अखेरीस सनरायझर्सने ६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. यापूर्वी गेले दोन हंगाम तो याच संघाचा भाग राहिला आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून केली होती.
सनरायझर्स हैदराबाद संघ-
केन विलियम्सन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जे सुचिथ, एडेन मार्करम, मार्को जॅन्सेन, रोमॅरियो शेफर्ड, सीन ऍबॉट, रविकुमार समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी
महत्वाच्या बातम्या-
भारतीय महिला संघाची न्यूझीलंडविरुद्ध शरणागती! स्वीकारला सलग चौथा पराभव (mahasports.in)
पाकिस्तानी गोलंदाजाने भडकावली सहकार्याच्या श्रीमुखात! पीएसएलमधील व्हिडिओ व्हायरल (mahasports.in)
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला… (mahasports.in)