पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स आणि पेशावर झाल्मी यांच्यात सामना खेळला गेला. लाहोर कलंदर्स संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रउफ (haris rauf) याने या सामन्यात एक विकेट घेतली आणि ३६ धावा खर्च केल्या. ही विकेट घेतल्यानंतर रउफ आक्रमक अंदाजात दिसत होता आणि अशातच त्याने सहकारी खेळाडू कामरान गुलाम (kamran ghulam) याला कानाखाली मारली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियाव व्हयरल होत आहे.
लाहोर कलंदर्स आणि पेशावर झाल्मी यांच्यातील हा सामना सोमवारी (२१ फेब्रुवारी) खेळला गेला. पेशावर संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लहोर कलंदर्स संघासाठी हारिस रउफने दुसऱ्या षटकात विरोधी संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद हारिस यांची विकेट घेतली. परंतु, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर कामरान गुलामने पेशावरचा सलामीवीर हजरतुल्ला जजई याचा झेल सोडला होता आणि यानंतर गोलंदाजी करणारा हारिस रउफ रागावल्याचे दिसले होते.
रउफने टाकलेल्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेव्हा मोहम्मद हारिसची विकेट मिळाली, तेव्हा सर्व खेळाडू जल्लोष करू लागले. त्यावेळी कामरान गुलाम देखील आनंद व्यक्त करण्यासाठी रउफ जवळ आला आणि अशातच रउफने त्याच्यावर राग काढला. कामरान जवळ येताच रउफने त्याच्या कानाखाली मारल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी, कामरानने या घटनेनंतर कसलेही प्रत्युत्तर दिले नाही आणि तो आनंदात दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Wreck-it-Rauf gets Haris! #HBLPSL7 l #LevelHai l #LQvPZ pic.twitter.com/wwczV5GliZ
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 21, 2022
दुसऱ्या षटकात जरी कामरानने रउफकडून मार खाल्ला असला तरी, सामन्यात पुढे त्याने चांगले प्रदर्शन केले आणि रउफही त्यामुळे प्रभावित झाला. १७ व्या षटकात पेशावर संघाचा कर्णधार वहाब रियाजला कामरानने धावबाद केले. विकेट घेतल्यानंतर कामरान जल्लोष करत होता आणि तेव्हा रउफने त्याला मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. सहकारी खेळाडूला कानाखाली मारल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून अद्याप हारिस रउफवर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीय.
हारिस रउफ आधीही अडकला होता वादात
दरम्यान, दोन वर्षांपूर्वीही हारिस रउफ एका वादात अडकला होता. त्यावेळी बिग बॅश लीगमध्ये खेळताना विकेट घेतल्यानंतर रउफ गळा कापण्याची ऍक्शन करत असायचा. त्याची जल्लोष करण्याची पद्धत अनेकांना आवडत नसायची आणि त्यांनी त्याविषयी तक्रारही केली होती. बीबीएलने अधिकृत ट्वीटवर याविषयी नाराजी व्यक्त केली होती.
This stump cam footage is BRUTAL! ???? #BBL09 pic.twitter.com/0LzeLrqYTa
— KFC Big Bash League (@BBL) January 2, 2020
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनात मोठा बदल; ‘त्या’ व्यक्तीच्या जागी…
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला…
गुजरात जायंट्सवर भारी पडले बंगळुरू बुल्स, मोठा विजय मिळवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश