टी२० विश्वचषकाचे अंतिम २ संघही आता निश्चित झाले आहेत. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. यासह दोघांनाही स्पर्धेची तिकिटे मिळाली आहेत. विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात सामने होणार आहेत. टीम इंडियालाही यावेळी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. २००७ मध्ये भारताने शेवटचा टी२० विश्वचषक जिंकला होता. म्हणजेच १५ वर्षांपासून भारत विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. रोहित शर्माचा कर्णधार म्हणून चांगला रेकॉर्ड आहे, अशा स्थितीत त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
सुपर १२ मध्येही २ गट
सुपर १२ मध्ये २ गट तयार करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना गट १ मध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय २ संघांना पात्रता फेरीतूनही स्थान मिळेल. गट-अ मधील विजेता आणि गट-ब मधील उपविजेता संघाला येथे खेळायचे आहे. तर बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना गट २ मध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय फेरी १ मधील गट-ब मधील विजेता आणि गट-अ मधील उपविजेत्या संघालाही स्थान देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजचेही येथे खेळण्याची शक्यता जास्त आहे. दोन्ही गटातील टॉप २ संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबरला होणार आहेत. फायनल १३ नोव्हेंबरला होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेच्चा मागील हंगामाचा विजेता आहे.
भारतीय संघाचे सामने असे असणार
२३ ऑक्टोबर – पाकिस्तान
२७ ऑक्टोबर – गट अ उपविजेता
३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका
२ नोव्हेंबर – बांगलादेश
६ नोव्हेंबर – गट ब विजेता
दरम्यान, भारतीय संघात सध्या अनेक खेळलाडूंना स्थान मिळण्यावरून वाद विवाद सुरू आहेत. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्म मध्ये आहे. अशात त्याला संघात स्थान मिळायला हवे की नाही यावरून अनेक दिग्गज आपापली प्रतिक्रिया देत आहेत. अशात बीसीसीआय आणि निवडकर्त्यांपुढे अनेक प्रश्न उपस्थित असतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गांगुली-शहा यांना अजून थोडे दिवस राहुद्या; बीसीसीआयची कोर्टात धाव
बीएसएएम’कडून राष्ट्रीय पदकविजेते आणि अध्यक्ष राजन खिंवसरा यांचा सत्कार