---Advertisement---

आयपीएल हंगामातील पहिल्याच सामन्यात ‘सुपर कॅच’, रहाणेच्या चपळाईमुळे विराट तंबूत

On: शुक्रवार, मार्च 22, 2024 10:01 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला होता. त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने क्षणाचाही विलंब न करता फलंदाजी निवडली होती. तर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने चांगली सुरुवात करून दिली होती. पण नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव अडखळला होता. त्यानंतर धावांची गती वाढवण्याच्या नादात विराट कोहली अजिंक्य रहाणेच्या हातात कॅच देऊन 21 धावांवर आऊट झाला आहे. पण सर्वत्र चर्चा होत आहे ती अजिंक्य रहाणेच्या जबरदस्त कॅचची, तर याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

याबरोबरच हा संपूर्ण प्रकार मुस्तफिझुर रहमानच्या 12 व्या षटकातील घडला दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने मिड ऑनच्या दिशेने फटका मारला होता. पण रहाणेनं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि मिड विकेटच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर राईट हातात स्लाईट मारत झेल पकडला. पण सीमारेषेवर आदळणार इतक्यात धावत आलेल्या रचिन रविंद्रकडे चेंडू फेकला आणि त्याने झेल घेतला आहे.

https://twitter.com/mufa_kohli/status/1771199676492001498

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---