इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद संघ मागील 3 वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. संघ 2021 आणि 2022 हंगामात आठव्या स्थानी राहिला होता. तसेच, आयपीएल 2023 हंगामात हैदराबाद सर्वात खाली म्हणजे 10व्या स्थानी होता. 2016 हंगामाचा किताब जिंकणाऱ्या या संघाचे प्रदर्शन पाहून स्टेडिअममध्ये उपस्थित असणारी मालकीण काव्या मारन खूपच निराश झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात काव्या मारनला निराश पाहून रजनीकांत दुखी झाले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठे भाष्य केले आहे.
आयपीएल 2023मध्ये जिंकले फक्त 4 सामने
संघात स्टार खेळाडूंची भरणा असूनही सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ सातत्याने खराब प्रदर्शन करत आहे. आयपीएल 2023 हंगामात हैदराबाद संघ गुणतालिकेत तळात होता. त्यांना 14 सामने खेळून फक्त 4 सामने जिंकण्यात यश आले होते. मागील 3 हंगामात हैदराबादला प्लेऑफसाठी क्वालिफायदेखील करता आले नाहीये.
दुसरीकडे, मालकीण काव्या मारन (Kavya Maran) ही आपल्या संघाला चीअर करण्यासाठी स्टेडिअममध्ये हजर असते. खेळासाठी तिची आवड यावेळी पाहायला मिळते. मात्र, संघाच्या खराब प्रदर्शनामुळे ती मैदानावर नेहमी निराश दिसते. काव्याला निराश पाहून साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनाही वाईट वाटले. त्यांनी काव्याविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले रजनीकांत?
सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आगामी ‘जेलर’ सिनेमाच्या ऑडिओ लाँचवेळी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचे मालक कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांच्याकडे विनंती केली आहे की, त्यांनी संघात चांगले खेळाडू घ्यावे. त्यांना काव्या मारनला टीव्हीवर दुखी पाहायचे नाहीये. रजनीकांत म्हणाले की, “कलानिधी मारन यांनी सनरायझर्स हैदराबाद संघात चांगल्या खेळाडूंना घेतले पाहिजे. आयपीएलदरम्यान टीव्हीवर काव्याला अशाप्रकारे पाहून मला खूप वाईट वाटते.”
खरं तर, हैदराबाद संघाने आपले स्टार खेळाडू डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, राशिद खान आणि जॉनी बेअरस्टो यांना एकेक करून रिलीज केले होते. कदाचित तेव्हापासूनच संघाचा फॉर्म खराब होण्यास सुरुवात झाली. मागील दोन हंगामातील हैदराबादचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले होते.
आयपीएल 2016मध्ये जिंकलेला किताब
आयपीएल 2016मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करून एकमेव किताब जिंकले होते. हा पराक्रम हैदराबादने डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली केला होता. मात्र, हैदराबादने वॉर्नरला 2021च्या हंगामानंतर रिलीज केले होते. (superstar rajnikanth on sunrisers hyderabad owner kavya maran during ipl sad face)
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयकडून संजू सॅमसनवर अन्याय! क्रिकेटच्या जंटलमनसोबत घडतंय राजकारण?
नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video