• About Us
  • Privacy Policy
शनिवार, सप्टेंबर 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video

नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video

Atul Waghmare by Atul Waghmare
जुलै 29, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Ben-Stokes-Catch

Photo Courtesy: Twitter/englandcricket


ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे सुरू आहे. या सामन्यातील पहिऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात 283 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियालाही दुसऱ्या दिवशी 295 धावांवर सर्वबाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाने 12 धावांची आघाडी घेतली. मात्र, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. या मालिकेत 4 सामन्यांनंतर स्टोक्सचा संघ 1-2ने पिछाडीवर आहे. स्टोक्स गोलंदाजी, फलंदाजीच नाही, तर क्षेत्ररक्षणातही आपली भूमिका बजावत आहे. अशात स्टोक्सचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

बेन स्टोक्सचा शानदार झेल
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सीमारेषेवर शानदार झेल पकडला. दिवसाच्या अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) स्ट्राईकवर होता. यावेळी जो रूट गोलंदाजी करत होता. रूटच्या चेंडूवर कमिन्सने जोरदार फटका मारला. यावेळी चेंडू हवेत होता, तेव्हाच सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या बेन स्टोक्सने एक पाय हवेत ठेवून झेल पकडला.

स्टोक्सला दुसऱ्या प्रयत्नात यश
झेल घेताच स्टोक्सचे संतुलन बिघडले आणि तो सीमारेषेच्या पलीकडे पडणारच होता. तेवढ्यात त्याने चेंडू पुढे फेकला आणि स्वत: सीमारेषेच्या पलीकडे गेला. त्यानंतर तो पुन्हा झेल पकडण्यासाठी मैदानात आला आणि दुसऱ्या प्रयत्नात त्याला झेल पकडण्यात यश आले. त्याने झेल घेताच स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जो रूटही भलताच खुश झाला होता. कमिन्स यावेळी वैयक्तिक 36 धावांवर बाद झाला. या विकेटमुळे ऑस्ट्रेलिया संघाचा डाव संपुष्टात आला.

What a way to finish the day! 😮

A stunning grab from the captain brings Day 2 to a close 👏

Australia lead by 1️⃣2️⃣ at the end of the first innings…#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/EdsUjrfmk7

— England Cricket (@englandcricket) July 28, 2023

ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1ने आघाडीवर
ऑस्ट्रेलिया संघाने दिवसाची सुरुवात एक विकेट 61 धावांनी केली होती. ढगाळ वातावरण असल्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थितीत संघाने खूपच सावधगिरी बाळगत धावा करण्याऐवजी विकेट्स वाचवण्यावर भर दिला. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅब्यूशेन यांनी 156 चेंडूत 42 धावांची भागीदारी रचली. स्मिथने अनुभवी जेम्स अँडरसन याच्याविरुद्ध सलग 2 चौकार मारत संघाचे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया संघ सध्या मालिकेत 2-1ने आघाडीवर आहे. तसेच, ही मालिका जिंकण्यासाठी त्यांना हा सामना फक्त अनिर्णित निकाली काढण्याची गरज आहे. (eng vs aus 5th test 2023 ben stokes england captain take pat cummins stunner catch near boundary line)

महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिकेच्या मेजर लीगमध्ये MI न्यूयॉर्कचा जलवा! सुपर किंग्सच्या नांग्या ठेचत मिळवले फायनलचे तिकीट
धोनीच्या गुडघ्याच्या सर्जरीविषयी पत्नी साक्षीची मोठी अपडेट; व्हिडिओ जोरदार व्हायरल


Previous Post

अमेरिकेच्या मेजर लीगमध्ये MI न्यूयॉर्कचा जलवा! सुपर किंग्सच्या नांग्या ठेचत मिळवले फायनलचे तिकीट

Next Post

बोंबला! हरमनप्रीतला ‘ते’ वागणं पडलं भलतंच महागात, संपूर्ण प्रकरण वाचा एकाच क्लिकवर

Next Post
Harmanpreet Kaur

बोंबला! हरमनप्रीतला 'ते' वागणं पडलं भलतंच महागात, संपूर्ण प्रकरण वाचा एकाच क्लिकवर

टाॅप बातम्या

  • विश्वचषकाच्या 5 दिवसांआधी युवराजची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ संघ खेळणार सेमीफायनल, एक नाव हैराण करणारे
  • वर्ल्डकपसाठी समालोचकांची मांदीयाळी, दिग्गज क्रिकेटपटू पसरवणार आपल्या आवाजाची जादू; पाहा यादी
  • अभिमानास्पद! गोळाफेक खेळात पदक जिंकणारी Kiran Baliyan पहिलीच भारतीय, 72 वर्षांनंतर घडवला इतिहास
  • ‘माझी प्लेइंग 11मधून अचानक हाकालपट्टी केली…’, भारताविरुद्ध न खेळवल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे विधान
  • कधी, कुठे आणि कसा पाहता येईल IND vs ENG संघातील सामना? एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती
  • वेलकम बॅक कॅप्टन! वर्ल्डकपआधी सराव सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने विजय
  • श्रीलंकेवर भारी पडली बांगलादेशची फलंदाजी, कर्णधार शाकिब नसताना संघाचा मोठा विजय
  • एमएसएलटीए भारती विद्यापीठ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन (14 वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकूण 134 खेळाडू सहभागी
  • स्टुअर्ट ब्रॉडच्या सन्मानार्थ मोठा निर्णय, ज्या स्टेडियमवर क्रिकेटशी प्रेम झालं, तिथेच लावली आपल्या नावाची पाटी
  • मोहम्मद रिझवानकडून विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्याच सराव सामन्यात शतक ठोकत दाखवून दिला फॉर्म
  • भारतीय खेळपट्टीवर तळपली बाबरची बॅट! सराव सामन्यातच विरोधांना मिळाली चेतावणी
  • भारतातील त्रासाला वर्ल्डकप सुरू होण्याआधीच कंटाळला जॉनी बेयरस्टो! सोशल मीडियावर निघाला राग
  • आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम
  • वर्ल्डकपआधी दुखापतींचे सत्र सुरूच! विलियम्सनपाठोपाठ ‘या’ संघाचाही कर्णधार जायबंदी
  • World Cup Countdown: फ्लाईंग कैफचा 20 वर्षापासून अबाधित असलेला विक्रम, श्रीलंकेविरुद्ध दाखवलेला जलवा
  • BREAKING: विश्वचषकाच्या सुरुवातीआधीच न्यूझीलंड संघाला धक्का, कॅप्टन केन दुखापतीमुळे बाहेर
  • “आपला संघ भारतापेक्षा कमजोर”, पाकिस्तानी दिग्गजाने सुनावली संघाला खरीखोटी
  • चॅम्पियन्स पुन्हा एकसाथ! 2011 विश्वचषकातील फक्त दोघेच हिरे खेळणार World Cup 2023
  • BREAKING: अखेरच्या क्षणी टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघात बदल, 115 सामने खेळलेल्या खेळाडूला केले इन
  • BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In