---Advertisement---

धोनीच्या गुडघ्याच्या सर्जरीविषयी पत्नी साक्षीची मोठी अपडेट; व्हिडिओ जोरदार व्हायरल

MS-Dhoni-And-Sakshi-Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा आयपीएल 2023 हंगामात गुडघ्याच्या दुखापतीने ग्रस्त होता. तरीही त्याने आपल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. याच हंगामात धोनी गुडघ्याच्या दुखापतीने ग्रस्त होता. हंगाम संपताच त्याने गुडघ्याची सर्जरी केली होती. धोनीच्या गुडघ्याची सर्जरी झाल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. मात्र, आता धोनीची दुखापत कशी आहे, यावर साक्षी धोनी हिने मोठी अपडेट दिली आहे. साक्षीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका मूव्ही स्क्रीनिंगदरम्यानचा आहे, ज्यात चाहते एमएस धोनी (MS Dhoni) याच्याविषयी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिच्याकडे विचारणा करत आहेत. व्हिडिओत साक्षी म्हणताना दिसत आहे की, धोनी सध्या रिहॅबमधून जात आहे. तिच्यानुसार, “रिकव्हर करत आहे. तो सध्या रिहॅबमध्ये आहे.” साक्षीकडून धोनीबाबत ही माहिती मिळाल्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अनेक सामन्यात गुडघ्यावर पट्टी बांधून मैदानात उतरलेला धोनी
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामादरम्यान धोनी अनेक सामन्यांमध्ये गुडघ्यावर पट्टी बांधून उतरल्याचे पाहायला मिळाले होते. गुडघ्याच्या दुखपतीमुळे धोनीला फलंदाजी करण्यासाठीही वरच्या क्रमांकावर पाठवले जात नव्हते. तो जेव्हाही फलंदाजीसाठी उतरायचा, तेव्हा जास्त चेंडू शिल्लक नसायचे. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने खुलासाही केला होता की, धोनीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रास होत होता, त्यामुळे तो शेवटी फलंदाजीसाठी यायचा.

आयपीएल निवृत्तीविषयी काय म्हणालेला धोनी?
आयपीएल 2023 हा धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो, असे म्हटले जात होते. मात्र, धोनीने ट्रॉफी जिंकल्यानंतर या वृत्तावर पूर्णविराम लावला. त्याने म्हटले होते की, यावर निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे जवळपास 7 महिने आहेत. तो असेही म्हणाला होता की, त्याच्यासाठी हा निर्णय सोपा नसेल.

मात्र, आता चाहते त्याच्या तब्येतीविषयी माहिती मिळाल्यामुळे खुश आहेत. (sakshi dhoni big updates on ms dhoni after knee surgery see video here)

महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथ बाद की नाबाद? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण- व्हिडिओ
कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड? बॉलिवूडशी खास कनेक्शन, लेटेस्ट फोटोंची इंटरनेटवर चर्चा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---