---Advertisement---

स्मिथ बाद की नाबाद? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण- व्हिडिओ

Steve-Smith-And-Jonny-Bairstow
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 मालिकेचा पाचवा कसोटी सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 283 धावांवर गुडघे टेकले होते. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डावही दुसऱ्या दिवशी 295 धावांवर संपुष्टात आला. यासोबतच त्यांनी 12 धावांची आघाडी घेतली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान स्टीव्ह स्मिथ याला तिसऱ्या पंचांनी नाबाद घोषित केल्याच्या निर्णयावरून चर्चेला सुरुवात झाली आहे.

तिसऱ्या पंचांनी दिले नाबाद
ऑस्ट्रेलिया संघाच्या डावातील 78व्या षटकात ही घटना घडली. ख्रिस वोक्स हे षटक टाकत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने मिड-विकेटच्या दिशेने शॉट मारून दोन धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात तो क्रीझच्या मागे राहिला. यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) सब्स्टिट्यूट खेळाडू जॉर्ज एल्हॅम याच्या वेगवान थ्रोवर स्टम्प्स उडवले. स्मिथला समजले होते की, तो बाद झाला आहे. तो पव्हेलियनच्या दिशेने जात होता, पण तिसरे पंच नितीन मेनन यांनी बराच वेळ टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर स्मिथला नाबाद घोषित केले. नितीन मेनन यांनी वेगवेगळ्या अँगलने रिप्ले पाहिला आणि स्मिथला नाबाद घोषित केले.

बेअरस्टोने धावबाद होण्यापूर्वी बेल्सला केला स्पर्श
तिसऱ्या पंचांनुसार, चेंडू पकडण्यापूर्वीच बेअरस्टो याचे ग्लोव्हजमुळे दोनपैकी एक बेल्स हलल्या होत्या. त्यावेळी स्मिथची बॅट क्रीझच्या आत पोहोचली नव्हती. मात्र, दुसरी बेल्स अजूनही स्टम्पवर होती. नियमानुसार, चेंडू हातात आल्यानंतर बेल्स खाली पाडणे महत्त्वाच्या असतात. मात्र, जेव्हा बेअरस्टोने बेल्स पाडल्या, तोपर्यंत स्मिथ क्रीझच्या आत आला होता. त्यामुळे आता सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू आहेत.

https://twitter.com/englandcricket/status/1684947612816871424?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1684947612816871424%7Ctwgr%5E09782df580e0194aefc0b5b9df8c783a4a036757%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fsteve-smith-survives-on-run-out-decision-by-third-umpire-1107291

स्मिथचे शानदार अर्धशतक
स्टीव्ह स्मिथ याने जीवनदान मिळताच अर्धशतक ठोकले. त्याने यादरम्यान 123 चेंडूंचा सामना करताना 71 धावा केल्या. या धावा करताना त्याने 6 चौकारही मारले. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 295 धावा केल्या आणि 12 धावांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे स्मिथ केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) मैदानात कसोटीत सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू बनला आहे. त्याने या विक्रमात डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. स्मिथच्या नावावर या मैदानात 617 धावा झाल्या आहेत. तसेच, ब्रॅडमन यांच्या नावावर 553 धावांची नोंद होती. (cricketer steve smith survives on run out decision by third umpire)

महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड? बॉलिवूडशी खास कनेक्शन, लेटेस्ट फोटोंची इंटरनेटवर चर्चा
‘जेव्हाही मी खेळतो, तेव्हा तो माझी…’, चहलसोबतच्या स्पर्धेविषयी कुलदीपची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---