---Advertisement---

एका चुकीमुळे संकटात सापडला होता युवराज, परंतू आता होणार नाही कोणतीही कारवाई

On: रविवार, मार्च 28, 2021 10:37 AM
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग नुकताच मोठ्या अडचणीत सापडला होता. गतवर्षी अप्रत्यक्षपणे दलित समाजातील लोकांवर त्याने अभद्र आणि अपमानास्पद शब्दात टीका केली होती. पेशाने वकील व राष्ट्रीय आघाडी आणि दलित ह्यूमन राइट्सचे संयोजक असलेले रजत कलसन यांनी त्यावेळी युवराज विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुमारे ८ महिन्यांनंतर या प्रकरणाचा मुद्दा पुढे आल्याने त्याच्यावर एससी-एसटी कायद्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र आता या प्रकरणातून युवराज बचावला आहे. याप्रकरणी २६ मार्च रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली असून पोलिसांना युवराजविरूद्ध कठोर कारवाई करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

उच्च न्यायालयातील न्यायाधीश अमोल रतन यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाचा पूर्ण तपास केला जाईल. मात्र पुढील सुनावणी होईपर्यंत युवराजवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जाणार नाही. सोबत हांसी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधीक्षकांकडून याबाबतीत प्रतिज्ञापत्रही सादर करण्यास सांगितले गेले आहे. पुढील सुनावणीची तारिख दोन आठवड्यांनंतर देण्यात आली आहे.

नक्की काय घडले होते?

झाले होते असे की, गतवर्षी जून महिन्यात युवराज भारतीय सलामीवीर रोहित शर्मासोबत इंस्टाग्रावर लाइव्ह चॅट करत होता. यादरम्यान बोलताना युवराजने  जातिवाचक शब्दांचा वापर केला. तो म्हणाला की, ‘कुलदीप यादव सुद्धा ऑनलाइन आला आहे.’ यावर रोहित म्हणाला की, ‘हो. कुलदीप, युझवेंद्र चहल हे सगळेच ऑनलाइन आहेत, ते नुसते रिकामे बसलेले आहेत.’ तेवढ्यात रोहितला अडवत युवराज म्हणाला की, ‘या भंगी लोकांना काही काम नाही. युझीला (चहल) पाहा. कसला फोटो टाकला आहे त्याने त्याच्या कुंटुंबासोबतचा. मी त्याला एवढेच म्हणालो की, तू तुझ्या बापाला नाचवत आहेस. तू वेडा तर नाहीस ना, XXX’

युवराजच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती. अगदी त्यावेळी ट्विटरवर ‘#युवराज_सिंह_माफी_मांगो’ हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. यामुळे शेवटी युवराजला चहलची क्षणा मागावी लागली होती. या घटनेदरम्यान वकील कलसन यांनी हरियाणाच्या हांसी पोलिस अधिक्षकांपुढे युवराजविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याला अटक करण्याची मागणी केली होती.

परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर कोर्टाकडून संमती मिळाल्याने हरियाणा पोलिसांनी युवराजविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या कुलदीप-चहल जोडीच्या प्रदर्शनात बिघाड, यामागचे कारण कॅप्टनकूल तर नव्हे! पाहा कसं

कृणाल भारतीय संघाचा पाचवा गोलंदाज असूच शकत नाही; भारतीय दिग्गजाचे मोठे भाष्य

पहिल्या २ वनडेत ‘या’ धुरंधरांनी केले दमदार प्रदर्शन, ठरू शकतात ‘मॅन ऑफ द सीरिज’ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---