बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय गुरुवारी (18 मे) सुनावला. त्यामुळे आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन यावेळी करण्यात आले.
मागील जवळपास बारा वर्षांपासून सुरू असलेल्या बैलगाडा प्रेमींच्या यशाला गुरुवारी यश आले. सुप्रीम कोर्टाने याबाबतीत महाराष्ट्र सरकारचा निर्णय वैध ठरवत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. विधिमंडळ कायद्याने दिलेल्या निर्णयात कोर्ट कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे बैलगाडा शर्यतीत प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे छळ होत नसल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले गेले.
यापूर्वी डिसेंबर 2021 मध्येच सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली. 2011 मध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने बैल या प्राण्याचा गँजेटमध्ये समावेश केला. यानंतर महाराष्ट्र सरकारने २४ ऑगस्ट २०११ रोजी परिपत्रक काढून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणलेली. बैलगाडा मालक संघटनांनी प्राणी मित्र संघटनांच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयाचे दार ठोठावलेले. तेव्हापासून सुरू झालेला हा संघर्ष अखेर समाप्त झाला.
सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींसह तमिळनाडूतील जलीकट्टू या खेळाला देखील कायदेशीर परवानगी दिली. जलीकट्टू खेळावरील बंदी हटवण्यासाठी तमिळनाडूतील अनेक सेलिब्रिटींनी देखील मोहीम राबवली होती.
(Supreme Court Result On Bailgada Sharyat Bullock Cart Race)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले ऑफ्सची रेस रंगात! पुन्हा भिडणार मुंबई-सीएसके? जाणून घ्या समीकरणे
चाहत्यांनी विराट..विराट म्हणून डिवचल्यानंतर अशी होती नवीन उल हकची रिऍक्शन, पाहा व्हिडिओ