पुणे। द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत सुरज राठी, संकेत मुथा या खेळाडूंनी आपली विजयी मालिका कायम ठेवत बाद फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत डबल एलिमनेशन फेरीत पुण्याच्या सुरज राठी याने मुंबईच्या शयान राझमीचा 4-3(27-41, 22-44, 49-24, 55-13, 32-22, 36-27) असा संघर्षपूर्ण पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह बाद फेरी गाठली.
पुण्याच्या माधव जोशीने अमरदीप घोडकेचा 4-1(37-05, 49-15, 22-37, 42-05, 29-17) असा तर पुण्याच्या साद सय्यदने चिपळूणच्या सिद्धेश मुळ्येचा 4-1(08-47, 53-06, 61(49)-09, 38-21, 35-23) असा पराभव करून अंतिम पात्रता फेरीत धडक मारली. साद याने आपल्या खेळीत तिसऱ्या फ्रेममध्ये 49 गुणांचा ब्रेक नोंदविला. मुंबईच्या अजिंक्य येलवेने आपला शहर सहकारी अनंत मेहताचा 4-3(17-39, 39-09, 19-31, 34-15, 22-30, 28-18, 36-33) असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
डबल एलिमनेशन राउंड:
अनंत मेहता(मुंबई)वि.वि.ओमर फारुकी(औरंगाबाद)4-3(17-27, 44-20, 09-29, 03-32, 35-11, 38-08, 42-11);
अश्विन पळणीतकर(पुणे)वि.वि.पोरस शहा(मुंबई)4-2(36-23, 38-12, 24-39, 11-33, 47-21, 45-08);
सुरज राठी(पुणे)वि.वि.शयान राझमी(मुंबई)4-3(27-41, 22-44, 49-24, 55-13, 32-22, 36-27);
अमरदीप घोडके(पुणे)वि.वि.अभिषेक बजाज(मुंबई) 4-3(09-36, 33-32, 00-39, 40-14, 21-51, 30-21, 54-09);
माधव जोशी(पुणे)वि.वि.तुषार सावदी(पुणे)4-3(35-17, 10-45, 29- 22, 08-44, 41-09, 06-48, 32-22);
साद सय्यद(पुणे)वि.वि.निलेश पळणीतकर(पुणे)4-1(36-01, 34-08, 28-24, 19-53, 40-01);
अनंत मेहता(मुंबई)वि.वि.रोहन सहानी(मुंबई)4-2(21-31, 34-20, 36-19, 31-17, 16-48, 37-05);
राजवर्धन जोशी(पुणे)वि.वि.निशाद चौघुले(पुणे)4-1(42-26, 32-19, 44-17, 20-29, 36-18);
माधव जोशी(पुणे)वि.वि.अमरदीप घोडके(पुणे)4-1(37-05, 49-15, 22-37, 42-05, 29-17);
साद सय्यद(पुणे)वि.वि.सिद्धेश मुळ्ये(चिपळूण)4-1(08-47, 53-06, 61(49)-09, 38-21, 35-23);
अजिंक्य येलवे(मुंबई)वि.वि.अनंत मेहता(मुंबई) 4-3(17-39, 39-09, 19-31, 34-15, 22-30, 28-18, 36-33);