---Advertisement---

‘या’ ३ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं सुरेश रैनाचे अफेयर, अनुष्कासोबतही होती चर्चा

On: मंगळवार, ऑगस्ट 18, 2020 12:50 PM
---Advertisement---

नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सुरेश रैनाने ५ वर्षांपुर्वी साॅफ्टवेअर इंजिनीयर प्रियांका चौधरीशी विवाह केला होता. लग्नापुर्वी प्रियांका नेदरलॅंडमध्ये राहत होती. ३ एप्रिल २०१५मध्ये लग्न झालेल्या या जोडीला ग्रेसिया नावाची मुलगी आणि रियो नावाचा मुलगा आहे.

तिने आपले शिक्षण साॅफ्टवेअर इंजिनीअर म्हणून पुर्ण केले असून एक आयटी प्रोफेशनल म्हणून तीने नेदरलॅंडमध्ये काम केले आहे. यात एक्सेन्जर, विप्रोसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. सध्या ती बालकांसाठी सुरु केलेल्या एनजीओमध्ये काम पाहते. या एनजीओमधून महिला व बालकांबद्दल समाजात जनजागृतीचे काम केले जाते. २०१७मध्ये टेड टाॅकमध्ये तीने भाषणही दिले आहे. तसेच प्रियांका फूटबाॅल खेळाची चाहती आहे.

तसं तर, लग्नापुर्वी बऱ्याच क्रिकेटपटूंचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेयर असल्याचे वृत्त आपण सर्वांनी पाहिली आहेत. रैनाच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. लग्नापुर्वी रैनाचे नाव एक-दोन नव्हे तर तीन बॉलिवूड अभिनेत्रींसोबत चर्चेत राहिला होते. या लेखात त्या तीन बॉलिवूड अभिनेत्रींविषयी माहिती देण्यात आली आहे. Suresh Raina Affair With 3 Bollywood Actress

श्रुती हसन (Shruti Hasan) –

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन आणि सुरेश रैनाच्या अफेयरची सुरुवात मैत्रीने झाली होती. ते सुरुवातीला एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि पुढे त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. श्रुती आयपीएलदरम्यान रैनाला चियर करण्यासाठी उपस्थित राहायची. रैना श्रुतीला त्याचा लकी चार्म समजत असायचा.

पण, पुढे दोघांनीही त्यांच्यातील प्रेम संबंधाला अमान्य केले होते. त्यावेळी रैनाने ट्विट करत लिहिले होते की,”माध्यमातील क्रिकेटपटूंच्या अफेयरच्या वृत्तांना हटवायला पाहिजे, कारण त्यांची कोणीही पुष्टी करत नाही. मला एकदा स्पष्ट करायचे आहे की, मी कोणालाही डेट करत नाही.”

रैना आणि प्रियंकाला रियो हा मुलगा झाल्यानंतर श्रुतीने रैनाला शुभेच्छा दिल्या होत्या.

पूर्णा पटेल (Poorna Patel) –

उद्योग व सार्वजनिक उपक्रमांचे माजी कॅबिनेट मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल हिच्यासोबत रैनाचे अफेयर असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. पूर्णा ही एमएस धोनीची पत्नी साक्षीची खूप चांगली मैत्रिण आहे.

रैना आणि पूर्णाचे शिर्डीच्या साई मंदीरातील फोटो व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यात अफेयर असल्याच्या चर्चांना उधान आले होते. पण, या दोघांनीही कधी त्यांच्यात अफेयर असल्याचा स्विकार केला नव्हता. जेव्हा एखादा क्रिकेटपटू मुलीसोबत असल्याचे दिसते, तेव्हा त्यांच्या प्रेम संबंधाच्या अफवा सुरु होतात. रैना आणि पूर्णाच्या अफेयरचाही खूप प्रचार झाला होता. ते दोघेही आता आपापल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहेत.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) –

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच्या अफेअरनंतर डिसेंबर २०१७ला लग्न केले होते. ते दोघेही आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. सोशल मीडियाद्वारे दोघेही त्यांच्यातील प्रेमाला सर्वांसमोर व्यक्त करताना दिसतात.

अनुष्का ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. विराटपुर्वी तिचे रैनासोबत अफेयर असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. माध्यमातील वृत्तांनुसार रैना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला अनुष्काला डेट करत होता. त्यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. त्यावेळी अनुष्का तिच्या चित्रपटाच्या शूटींगसाठी तिथे गेली होती आणि रैना क्रिकेट मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता.

पण, रैना आणि अनुष्काने कधीही त्यांच्यातील अफेयरच्या वृत्तांची पुष्टी केली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---