---Advertisement---

२००६ पासून टी२०मध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला पराक्रम रैनाने आज केला

On: सोमवार, फेब्रुवारी 25, 2019 2:13 PM
---Advertisement---

दिल्ली | सईद मुश्ताक अली ट्राॅफी स्पर्धेत भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने एक खास विक्रम केला आहे. ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात ८ हजार धावा करणारा तो जगातील ६वा तर भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने  आज पाॅंडेचेरी संघाविरुद्ध खेळाताना १२ धावा करत हा पराक्रम केला.

या सामन्यापुर्वी रैनाच्या नावावर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात २९९ सामन्यांत ३३.५६च्या सरसरीने ७९८९ धावा जमा होत्या. आज त्याने केलेल्या खेळीमुळे ३०० सामन्यांत त्याच्या ८००१ धावा झाल्या आहेत.

तसेच तो ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात ३०० सामने खेळणारा केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. यापुर्वी एमएस धोनीने (३०१) भारताकडून ३०० सामने खेळण्याचा पराक्रम केला होता.

सईद मुश्ताक अली ट्राॅफी स्पर्धेतच रैनाने यापुर्वीच्या सामन्यात ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारातील ३०२वा षटकार मारण्याचा पराक्रम केला. ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात ३०० षटकार मारणारा तो रोहित शर्मानंतरचा (३२६) दुसराच खेळाडू आहे.

https://twitter.com/SherryPaaji/status/1099954679956598784

महत्त्वाच्या बातम्या-

–जसप्रीत बुमराह असा मोठा पराक्रम करणारा दुसराच भारतीय गोलंदाज

–टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अशी वाहिली श्रद्धांजली

–धावा केल्या २४ तरी किंग कोहलीच्या नावावर झाला हा विश्वविक्रम…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment