माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी आयपीएल 2025 च्या रिटेनशनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रैना आणि रायुडूच्या मते, खेळाडूंच्या कोअर ग्रुपमध्ये फारसा बदल न झाल्यास संघांची जिंकण्याची शक्यता वाढते.
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात प्रत्येक संघाना चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता आगामी आयपीएल हंगामापूर्वी होणाऱ्या मेगा लिलावत खेळाडूंना रिटेन करण्याबाबत संघांची वेगवेगळी मतं आहेत. काही संघांचं 8 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी असायला हवी, असं म्हणणं आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, चार-पाच खेळाडूही ठीक आहेत. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, या मुद्यावर बोलताना अंबाती रायुडू म्हणाला की, “रिटेन्शन जास्त असले पाहिजे, कारण संघ त्यांच्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करतात. कोणत्याही संघाचा कोअर ग्रुप त्या संघाला वेगळा बनवतो. कोअर ग्रुपमध्ये फारसा बदल न झाल्यास टीम कल्चर अबाधित राहतं.”
त्याचवेळी माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना म्हणाला की, “तो रायडूच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मेगा लिलाव दर तीन वर्षांनी होतो. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल खेळाच्या हिताचंच काम करेल.”
अंबाती रायुडू आणि सुरेश रैना लवकरच लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेला 20 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. या स्पर्धेत ख्रिस गेल, सुरेश रैना, शिखर धवन, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू आणि हरभजन सिंगसारखे खेळाडू खेळणार आहेत. ही लीग 16 ऑक्टोबरपर्यंत खेळली जाणार असून यामध्ये एकूण 6 संघ सहभागी होतील. सुरेश रैना अल्टिमेट टीम हैदराबाद संघाकडून खेळणार आहे. तर अंबाती रायुडू कोणार्क सूर्याज ओडिशा संघाकडून खेळणार आहे.
हेही वाचा –
भारतीय कसोटी संघाच्या यशात कोणाचा वाटा मोठा? गंभीर-विराटनं यांना दिलं श्रेय
आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा उलटफेर, आयपीएलमधील फ्लॉप खेळाडूची अव्वल स्थानी झेप
आयपीएल 2025 पूर्वी मोठी घडामोड, रिकी पॉन्टिंगची या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती