---Advertisement---

बॅटही तुटली अन् विकेटही गमावली, ट्रेंट बोल्टने ‘असे’ केले सुरेश रैनाला बाद; पाहा व्हिडिओ

On: सोमवार, सप्टेंबर 20, 2021 1:24 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना रविवारी (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेन्नईने फलंदाजी करताना २० षटकात १५६ धावा केल्या होत्या. यामध्ये चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने संघासाठी महत्वाची खेळी केली.

सीएसकेची सामन्यातील सुरुवात खराब झाली होती, संघ पहिल्या १० षटकांमध्ये ५० धावांचा टप्पाही गाठू शकला नव्हता. मात्र ऋतुराजने नंतर संघासाठी ८८ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला समाधानकारक १५६ धावसंख्येपर्यंत घेऊन गेला. सीएसकेचे अनुभवी फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. यास दिग्गज सुरेश रैनाचाही समावेश आहे. एका क्षणी तो फलंदाजी करत असाताना त्याची बॅट तुटली आणि त्याने त्याची विकेटही गमावली.

चेन्नईच्या एकापाठोपाठ एक विकेट्स जात असताना अनुभवी फलंदाज सुरेश रैनाकडून सर्वांनाच चांगल्या खेळीची आशा होती. रैना जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यानंतर तो धावा करण्यासाठी खूप संघर्ष करताना दिसत होता. त्याने त्याच्या फलंदाजीदरम्यान एक चौकार मारला, जो त्याच्या बॅटच्या कोपऱ्याला लागून सीमारेषेपार गेला होता.

मात्र, एका चौकारानंतर रैनाने खराब शाॅट मारला आणि त्याची विकेट गमावली. मुंबईच्या ट्रेंट बोल्टने त्याला तंबूत पाठवले. तो केवळ सहा चेंडू खेळून बाद झाला. तो बोल्टने टाकलेल्या एका अप्रतिम चेंडूवर चुकीचा शाॅट खेळला आणि राहुल चाहरने त्याने मारलेला चेंडू झेलला. तसेच बोल्टने टाकलेल्या या चेंडूवर त्याची बॅटही तुटली.

https://twitter.com/CowCorner9/status/1439606008934850564

चेन्नई सुपर किंग्जला सामन्याची सुरुवात चांगली करता आली नाही. पण नंतर ऋतुराज गायकवाडने केलेल्या ८८ धावांच्या खेळीमुळे त्यांनी ६ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारली आणि मुंबईसमोर विजयासाठी १५७ धावांचे आव्हान ठेवले. पण मुंबईला ८ बाद १३६ धावाच २० षटकांअखेर करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू ‘अनिल दलपत’

वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी

‘आय सब्जी नही पोहे बनेंगे’, शिखर धवन-पृथ्वी शॉ जोडीचा भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---