---Advertisement---

आयपीएल इतिहासात असा पराक्रम करणारा सुरेश रैना ठरला पहिलाच खेळाडू

On: शनिवार, मार्च 23, 2019 10:42 PM
---Advertisement---

चेन्नई। आजपासून आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात झाली आहे. या मोसमातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सुरु आहे. या सामन्यात चेन्नईचा फलंदाज सुरेश रैनाने मोठा पराक्रम केला आहे.

त्याने सामन्यात 15 वी धाव घेताच आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 5000 धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी कोणालाही आयपीएलमध्ये 5000 धावा करता आलेल्या नव्हत्या.

मात्र रैना या 5000 धावा पूर्ण केल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याला 19 धावांवर मोईन अलीने बाद केले. शिवम दुबेने रैनाचा झेल घेतला.

या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीलाही 5000 धावा करण्याची संधी होती. त्यासाठी त्याला 52 धावांची गरज होती. पण तो आज 6 धावांवरच बाद झाला.

बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना चेन्नई समोर विजयासाठी 71 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने शेन वॉटसनची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि रैनाने चेन्नईचा डाव सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

5004 धावा – सुरेश रैना (177 सामने)

4954 धावा – विराट कोहली (164 सामने)

4493 धावा – रोहित शर्मा (173 सामने)

4217 धावा – गौतम गंभीर (154 सामने)

4086 धावा – रॉबिन उथप्पा (165 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

त्यानंतर यॉर्कर किंग लसिथ मलिंगा घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी चेन्नई – बेंगलोरचे असे आहेत ११ जणांचे संघ

कोहलीच्या या गोष्टीची रिषभ पंतला वाटते सर्वात जास्त भीती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment