इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामाच्या (आयपीएल २०२१) दुसऱ्या टप्प्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. अशाच आयपीएलच्या सर्व संघांनी दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ यूएईला पोहोचले आहेत. या संघाच्या सराव सत्राला देखील सुरुवात झाली आहे.
सीएसकेच्या सरावादरम्यान संघातील खेळाडू सुरेश रैनाने सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला एक पुस्तक भेट म्हणून दिले. सुरेश रैनाच्या आयुष्यावर आधारित असलेले हे पुस्तक आहे. ‘बिलिव्ह: व्हॉट लाइफ अँड क्रिकेट टॉट मी’ असे या आत्मचरित्राचे नाव आहे. सीएसके संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे.
तसेच सीएसकेने हा फोटो शेअर करत त्यावर ‘चिन्ना थाला आणि द अनटोल्ड स्टोरी’ असे कॅप्शन देखील दिले आहे. यानंतर सीएसकेच्या या ट्विटला रिट्विट करत रैनाने कॅप्शनमध्ये ‘माझ्या अनटोल्ड स्टोरीवर थालाचा स्पर्श’ असे लिहिले आहे.
Chinna Thala and the untold story 💛
Be the BE7IV3RS 📒 @ImRaina #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/q3DUwXFHER
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 26, 2021
सुरेश रैनाने महेंद्रसिंग धोनी सोबतच मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच हे दोघे ही सीएसके संघासाठी गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र खेळत आहे. रैनाने त्याच्या आत्मकथेत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोबत असलेल्या संबंधांविषयी देखील लिहिले आहे.
Thala’s touch on my untold story! 💛#Believe pic.twitter.com/1vGuLUGMmX
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 26, 2021
यामध्ये त्याने लिहिले, “मी अनाडी असल्यामुळे माही भाई नेहमी माझी चेष्टा करायचा. मी त्याला अनेक वेळा बोलताना ऐकले आहे, की मी जर त्याच्या खोलीत असेल तर काही ना काही तरी चुकीचे घडते, किंवा कोणत्या ना कोणत्या वस्तूचे नुकसान होते. किंवा आणखी काही. यावर धोनी भाई मला म्हणायचा ‘तू असलास तर काही ना काही होत राहील.’ माझ्या मते माही भाईच्या या बोलण्यात काहीतरी तथ्य असावे.”
दरम्यान, आयपीएलचा १४ वा हंगामा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. मात्र, याचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. याबाबत सर्व संघांची तयारी देखील झालेली आहे. काही संघ यूएईला पोहोचले आहेत, तर काही यूएईला रवाना होण्याच्या तयारीत आहे. आयपीएल २०२१चा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–पुजाराच्या खेळीने ‘या’ खेळाडूचे वाढवले टेंशन; भारताकडून खेळण्यासाठी करावी लागणार आणखी प्रतिक्षा?
–“विराट विरुद्ध खेळताना साधी सोपी रणनिती”, ऑली रॉबिन्सनने केला खुलासा
–“आमच्यावरील दबाव वाढला होता”, दारुण पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीची कबुली