आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळेल. यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होईल. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. त्यानंतर (20 फेब्रुवारी) रोजी भारत-बांगलादेश संघ आमने-सामने असतील. तत्पूर्वी माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफी कसा जिंकू शकतो याबद्दल वक्तव्य केले आहे.
भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) मंगळवारी (4 फेब्रुवारी) म्हणाला की, “कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून धावा काढण्यास संघर्ष करत असतील, परंतु त्यांचा फॉर्म आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या यशाची गुरुकिल्ली असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये (19 फेब्रुवारी) पासून सुरू होईल आणि (9 मार्च) पर्यंत चालेल.”
सुरेश रैनाने (Suresh Raina) ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, “2023 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकानंतर रोहित शर्माचा स्ट्राइक रेट खूप सुधारला आहे. तेव्हापासून त्याने 119-1920च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो भारताच्या सर्वोत्तम वनडे फलंदाजांपैकी एक बनला आहे. रोहित आणि विराटसाठी मी असे म्हणेन की जेव्हा तुमच्याकडे भूतकाळातील चांगल्या कामगिरीचा मजबूत रेकॉर्ड असतो, तेव्हा तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो. ते एकमेकांना चांगली साथ देतात आणि दोघांमध्येही मोठ्या खेळी खेळण्याची क्षमता आहे. जर त्यांनी चांगली कामगिरी केली तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या मोहिमेला त्याचा मोठा फायदा होईल.”
पुढे बोलताना सुरेश रैना (Suresh Raina) म्हणाला, “मला वाटते की रवींद्र जडेजा नक्कीच खेळेल कारण तो वनडे सामन्यांमध्ये खूप प्रभावी आहे. कुलदीप यादव दुखापतीनंतर एकही सामना खेळलेला नाही पण आमच्याकडे अक्षर पटेल देखील आहे जो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दुबईच्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना हालचाल मिळेल, परंतु फिरकी गोलंदाज देखील महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे कुलदीप, अक्षर आणि जडेजा हे सर्वोत्तम फॉर्ममध्ये असले पाहिजेत.”
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्धचे 3 वनडे सामने नागपूर, अहमदाबाद आणि कटक येथे खेळले जातील.
2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा
भारताचे साखळी सामन्यांचे वेळापत्रक:
20 फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
23 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
2 मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; विराट कोहली RCBचे नेतृत्व करणार का? फ्रँचायझीने दिले मोठे संकेत
IND vs ENG; टी20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूला मिळाले बक्षीस, भारतीय संघात झाला समावेश
वैयक्तिक मिडले रिलेमध्ये सान्वी देशवालचा दुहेरी धमाका