आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघ जाहीर झाला आहे. पण त्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवची (Suryakuamr Yadav) निवड झाली नाही. त्यामुळे भारताला मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवची उणीव भासेल आणि तो संघासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकला असता, असा विश्वास माजी माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) व्यक्त केला आहे.
शनिवारी (18 जानेवारी) रोजी जाहीर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy) भारतीय संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) निवड झालेली नाही. 2023च्या वनडे विश्वचषकात खेळलेल्या 6 खेळाडूंना यंदा भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज व्यतिरिक्त, संघात स्थान न मिळालेल्या इतर खेळाडूंमध्ये प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन यांचा समावेश आहे, तर रविचंद्रन अश्विनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
सुरेश रैनाने (Suresh Raina) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “सूर्यकुमार हा विश्वचषक संघाचा अविभाज्य भाग होता. तो असा खेळाडू आहे जो, मैदानावर कोणत्याही ठिकाणाहून फटके मारू शकतो. तो खेळाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रति षटक 9 धावा करू शकतो. त्याच्याकडे त्याच्या खास खेळाने विरोधी संघावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “जर सूर्यकुमार यादव संघात असता तर तो ‘एक्स फॅक्टर’ असता. संघाला त्याची उणीव भासेल. आता जबाबदारी सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या टॉप 3 फलंदाजांवर असेल. सूर्यकुमार हा असा फलंदाज आहे जो कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताने जिंकला खो-खो विश्वचषक..! फायनलमध्ये नेपाळचा धुव्वा उडवत रचला इतिहास
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी यशस्वी जयस्वालला भारतीय संघात स्थान का? कर्णधाराने सांगितले कारण
भारताचा पुढचा कर्णधार कोण? सुरेश रैनाने सांगितले ‘या’ खेळाडूचे नाव