अखेर आयपीएल २०२१ स्पर्धेला पूर्णविराम लावण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कडक बायो बबल असून सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटपटूंनी आपल्या घरची वाट धरली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मुख्य खेळाडू सुरेश रैना देखील आपल्या घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सुरेश रैना हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतो. तसेच तो काही-ना-काही पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. त्याचे इंस्टाग्रामवर १५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो किचनमध्ये कढी बनवताना दिसून येत आहे. हा पदार्थ बनवण्याची रेसिपी त्याला त्याच्या बहिणीने शिकवली आहे. हे त्याने आपल्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. या व्हिडिओला साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे
https://www.instagram.com/p/COhigz0BZ0y/
चेन्नई सुपर किंग्ज संघाने केली उल्लेखनीय कामगिरी
गतवर्षी युएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यांना ७व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघ पुन्हा एकदा आपल्या जुन्याफॉर्म मध्ये आल्याचे दिसून आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने या आयपीएल हंगामात एकूण ७ सामने खेळले होते. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर केवळ २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
या हंगामात ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाने ७ सामने खेळले आहेत. यात त्याला १२३ धावा करण्यात यश आले होते. तसेच त्याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण २०० सामने खेळले आहेत. यात ३९ अर्धशतक झळकावत त्याने ५४९१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आले.. आर्याचे बाबा आले,’ आयपीएल वारीनंतर अजिंक्य रहाणे पोहोचला घरी; पत्नीने अशी दिली माहिती
कठोर परिश्रमाचे मिळणार फळ! कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी ‘या’ युवा खेळाडूंना मिळणार संधी?
फॉर्म सुधारण्यासाठी भारतातून इंग्लंडला घेतली धाव, तिथेही ठरला अपयशी; आता संघातील स्थान आलं धोक्यात