आयपीएल २०२२ स्पर्धा येत्या काही दिवसात सुरू होईल. याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये आयपीएल स्पर्धेचा लिलाव सोहळा(ipl mega auction) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. तर काही दिग्गज खेळाडू खाली हात परतले. याच खेळाडूंमध्ये दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा देखील समावेश होता. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळलेल्या सुरेश रैनाला (Suresh raina) यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान देण्यात रस दाखवला नाही. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या सुरेश रैनाला आगामी हंगामासाठी एकही खरिददार मिळाला नाही. लिलावाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी देखील तो अनसोल्ड राहिला. त्याची मुळ किंमत दोन लाख रुपये होती. २००८ नंतर ही दुसरीच वेळ असेल, ज्यामध्ये सुरेश रैना आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येणार नाही. आता लिलावात अनसोल्ड झाल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आगामी हंगामासाठी कर्णधार एमएस धोनीला रिटेन केले आहे. तर सुरेश रैनावर त्यांनी बोली लावली नाही. हेच कारण होते की, तो अनसोल्ड राहिला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरेश रैना म्हणतोय की, “जर धोनी पुढील हंगामात खेळणार नसेल तर मी देखील पुढील हंगामात खेळणार नाही. आम्ही २००८ पासून सीएसकेसाठी खेळतोय. जर आम्ही या वर्षी विजय मिळवला तर मी त्याला पुढच्या वर्षी देखील खेळण्याची विनंती करेल. मी माझा पूर्ण प्रयत्न करेल. जर तो खेळणार नसेल तर मी देखील कुठल्या आयपीएल संघासाठी खेळणार नाही.”
Why yrr ????????#SureshRaina | @ImRaina https://t.co/FtGQuIO45o
— Abhi (@CoverDrive001) February 13, 2022
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने एमएस धोनीसह २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तो धोनीला आपला गुरु मानतो. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल इतिहासात आतापर्यंत एकूण ४ वेळेस जेतेपद पटकावले आहे. यामध्ये सुरेश रैनाचे मोलाचे योगदान आहे. त्याला २०२१ मध्ये साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तरी देखील तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या :
विराट की रोहित, टी२०ची बादशाहत मिळवणार कोण? वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत रंगणार शर्यत
लाईव्ह ऑक्शनमध्ये चारू शर्मांकडून झालेली ही चूक तुमच्याही निदर्शनात आली नसेल, पाहा व्हिडिओ




