मुंबई । भारताचा स्टार अष्टपैलू गोलंदाज सुरेश रैनाने एमएस धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. तथापि तो आयपीएल खेळत रहाणार. यावर्षी त्याने चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यासाठीही बरीच मेहनत घेतली आहे. रैना कोरोनामुळे कित्येक महिने घरातच होता. घरीच राहून त्याने आयपीएलची तयारी सुरू केली होती.
सुरेश रैना याचे घर काही राजवाड्यापेक्षा कमी नाही. तो बर्याचदा आपल्या घराचे फोटो शेअर करतो. गाझियाबादशिवाय रैनाचे दिल्ली आणि लखनऊमध्येही घर आहे. गाझियाबादमधील त्याचे राजवाड्यासारखे घर राजनगर सारख्या पॉश भागात आहे.
तो याच घरात आपले आईवडील, बायको आणि मुलांसमवेत राहतो. माध्यमांच्या माहितीनुसार, त्याच्या घराची किंमत जवळपास 18 कोटी आहे. 2017 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुरेश रैनाच्या घरी आला होता. रैनाची लिव्हिंग रूम जुन्या अविस्मरणीय कौटुंबिक क्षणांनी सजली आहे.
https://www.instagram.com/p/CC_W04UhjrW/
33 वर्षीय स्टायलिश फलंदाज रैनाने पंधरा ऑगस्टच्या दिवशी धोनीपाठोपाठ निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
https://www.instagram.com/p/CAsF5D0gBwK/
2018 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. रैना सध्या आयपीएल खेळण्यासाठी दुबईला मध्ये दाखल झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.