रमीज राजा आणि बीसीसीआयमधील वाद ताजा असतानाच भारताच्या सुरेश रैना याने एक चांगले पाऊल उचलले.
भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना सध्या अबु धाबी टी10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत खुप साऱ्या देशाचे आजी आणि माजी खेळाडू भाग घेत आहेत. त्यातच भारताच्या सुरेश रैनाने पाकिस्तानचा युवा फंलदाज आझम खान याची भेट घेतली.
यष्टीरक्षक फलंदाज आझम खान (Azam Khan) या स्पर्धेत न्यूयॉर्क स्ट्राइकर्स या संघाकडून खेळत आहेे. आझमने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्यात तो रैनाची गळाभेट घेत आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या मैत्रीचा संदेश दिला.
https://www.instagram.com/p/ClY4U2BSLAY/?utm_source=ig_web_copy_link
आझम पाकिस्तान संघाकडून आतापर्यंत 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. तो कॅरिबियन प्रीमिअर लीग, लंका प्रीमिअर लीग आणि पाकिस्तान सुपर लीग बरोबरच जगातील बऱ्याच मोठ्या टी20 स्पर्धांमध्येे भाग घेतो. त्यातच अबु धाबी टी10 लीगमध्ये त्याच्या संघाने सुरुवातीला खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये एका सामन्यात विजय मिळवला.
दुसऱ्या बाजुला सुरेश रैना (Suresh Raina) याचा संघ डेक्कन ग्लॅडिएटर्सने आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. मात्र, पहिल्या सामन्यात रैनाची सुरुवात खराब झाली. त्याला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. त्याचा संघ निर्धारीत 10 षटकात 6 गडी गमावत 134 धावा बनवु शकला, ज्यात कर्णधार निकोलस पूरन याने नाबाद 77 धावा केल्या. या आव्हानाचा सामना करताना प्रतिस्पर्धी संघ टीम अबू धाबी निर्धारीत 10 षटकात 6 गडी गमावत 99 धावा करु शकला.
रोट सेफ्टी वर्ल्ड सिरीज सुरु होण्याआधी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर हे स्पष्ट झालेले की, तो या स्पर्धेत खेळताना दिसेल. निवृत्ती घेतल्यानंतर जगभरातील अनेक टी20 लीगने त्याच्याशी संपर्क साधला होता आणि भविष्यकाळात तो परदेशातही खेळताना दिसेल.(Suresh Raina mate Pakistani player Azam)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अय्यरने केली टीकाकारांची बोलती बंद! म्हणाला, ‘आता काय थेट टी20 मोडमध्ये…’
दणदणीत विजयासह मुंबई सिटी एफसी टेबल टॉपर; नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग सातवा पराभव